शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावात बिअरबारमध्ये चोरी; चार लाखांची विदेशी दारू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूनजीक राष्ट्रीय महामार्गावरील चैतन्य बिअरबार मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद केले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात ...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूनजीक राष्ट्रीय महामार्गावरील चैतन्य बिअरबार मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद केले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्यद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी विदेशी दारू ३२ बॉक्स, बिअर ३० बॉक्स लंपास करीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. असा चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी एका वाहनातून लंपास केला. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे चैतन्य बिअरबारचे मालक संजय निलखन, पुरुषोत्तम निलखन दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून ठाणेदार सुनील सोळंकेसह हेडकॉन्स्टेबल अशोक इंगळे, मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

-------------

श्वान पथकाला केले पाचारण

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण केलेे; परंतु अज्ञात चोरट्याचा सुगावा लागला नाही. घटनेची फिर्याद चैतन्य बिअरबारचे मालक संजय निलखन यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करीत आहेत.