शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आकाशात सलग चार दिवस पाहता येणार स्पेस स्टेशनचा नजारा

By atul.jaiswal | Updated: December 4, 2023 14:15 IST

विशेष म्हणजे हा नजारा अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातून दिसणार आहे.

अकोला : पावसानंतर आकाशातील धुलीकणांचे प्रमाण कमी झाल्याने आकाश निरीक्षण अधिक स्पष्ट होत असते. ग्रह-ताऱ्यांसोबतचआकाशात विविध घडामोडी अधुनमधून अनुभवता येतात.अशातच या महिन्यात मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव व ६ ते ९ डिसेंबर या सलग चार दिवसांत संध्याकाळच्या सुमारास निरभ्र आकाशात फिरती चांदणी अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा अनोखा नजारा नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हा नजारा अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातून दिसणार आहे.

अमेरिका, रशिया सह पंधरा देशांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेल्या या प्रकल्पात अत्याधुनिक अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून, त्याव्दारे विविध देशांतील वैज्ञानिक अभ्यास व संशोधन कार्य करीत आहेत. फुटबॉलच्या मैदानापेक्षा दीडपट आकाराचे हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून साधारण चारशे किलोमीटर अंतरावरून सूमारे दीड तासात दरताशी २७,५०० कि.मी.या वेगाने फिरत असते. पृथ्वीवरुन ज्या भागावरुन याचा प्रवास होतो तेव्हा त्या भागातील लोकांना या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा फिरत्या चांदणीच्या स्वरुपात दर्शनाचा लाभ घेता येतो. स्थान परत्वे वेळ, दिशा व तेजस्वीतेत काही बदल संभवतात. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येक आकाश प्रेमींनी आपआपल्या भागातून अवश्य अनुभवावा, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

असे होईल दर्शनबुधवार, ६ डिसेंबरला रात्रीच्या प्रारंभी ७ वाजता तीन मिनिटे फिरत्या तेजस्वी चांदणीचा प्रवास वायव्य ते पूर्वेकडे गुरु ग्रहाचे जरा अलिकडे होईल.गुरुवार, ७ डिसेंबरला संध्याकाळी ६:१२ ते ६: १८ या वेळी स्पेस स्टेशन उत्तरेकडून पूर्वेकडे जाताना दिसेल.शुक्रवार, ८ डिसेंबरला शूक्रवारी पुन्हा ७ वाजता फिरती चांदणी पश्चिम आकाशात दक्षिण दिशेला सरकताना पाहता येईल.शनिवार, ९ डिसेंबरला संध्याकाळी ६-११वा.वायव्येकडून आग्नेय दिशेला सुमारे सहा मिनिटे बघता येईल.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस