शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कोविड फैलावाचा वेग वाढतोय; दिवसभरात सहा पॉझिटिव्ह!

By राजेश शेगोकार | Updated: March 30, 2023 19:05 IST

कोविड फैलावाची गती वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अकोला - जिल्ह्यात कोविड फैलावाची गती वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. शिवाय, लक्षणे दिसून येत असल्यास डॉक्टरांना दाखवा. तसेच मास्कचा वापर करण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, सहा जणांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले.

रुग्णांमध्ये चार पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. यातील तीन रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यातील, तर तीन रुग्ण महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. दरम्यान, तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१वर पोहोचली आहे. कोविड रुग्ण संख्या वाढीचा वेग गत आठवड्यात वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. मास्कचा वापर करण्यासोबतच नागरिकांनी कोविड काळातील त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

रुग्णालयात ६ रुग्ण, १५ रुग्ण गृहविलगीकरणात

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे २१ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित १५ रुग्ण गृहविलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली.