शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

 शहर स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 23:55 IST

आयुक्तांनी झाडले रस्ते, उचलली घाण : नागरिक, व्यावसायिकांची बघ्याची भूमिका.

नितीन गव्हाळे,  अकोला : अकोला महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, १ जून रोजी सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून हाती खराटा घेऊन विविध भागात साफसफाई करीत सुमारे तीन तास श्रमदान केले. एवढेच नाहीतर त्यांनी स्वत: व कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवरची घाण साफ केली.

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणी तसेच शहरातील ज्या भागात जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे अशा भागांमध्ये १ जून रोजी सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रतनलाल प्लॉट, आंबेडकर नगर, एलआयसी ऑफिस, टॉवर चौक, महसूल कॉलनी, पत्रकार कॉलनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, आर.एल.टी.कॉलेज समोरील रस्ता, सिव्हील लाईन चौक परिसर, नवीन बस स्टॅन्डजवळील भाग आदी भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत या भागातील रस्ते, नाल्या आणि परिसरांची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच स्वच्छता झाल्यानंतर या भागातील सर्व नाल्यांमध्ये डास, अळी नाशक औषधीची फवारणी करण्यात आली आहे.

या विशेष स्वच्छता मोहिमेत मनपा उपायुक्त गीता ठाकरे, डॉ. मेघना वासनकर, शहर अभियंता नीला वंजारी, सहा.संचालक नगर रचना आशिष वानखडे, मनपा प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, सहा.आयुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, देविदास निकाळजे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय ठोकळ यांच्यासह सामाजिक संघटनांचे सदस्य, अशासकीय संस्थांचे सभासद, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, बचत गट, वस्ती स्तर संघ आदी सहभागी झाले होते. प्लास्टिक वस्तुंचा वापर बंद करा, अन्यथा कारवाई

नागरिकांनी आपल्या घरात किंवा प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून शहरात व परिसरात ईतरत्र तसेच नाली/नाल्यात न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकावा, तसेच शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीकने बनलेल्या वस्तूंचा वापर, विक्री व हाताळणी पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनील लहाने यांनी केले आहे.

टॅग्स :Akolaअकोला