शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नाफेडने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे थकले!

By राजेश भोजेकर | Updated: April 17, 2023 16:42 IST

खुल्या बाजारात भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी  नाफेडच्या शासकीय हरभरा खरेदी केंद्रात हरभरा विक्री केला.

अकाेला : खुल्या बाजारात भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी  नाफेडच्या शासकीय हरभरा खरेदी केंद्रात हरभरा विक्री केला. परंतु, या शेतकऱ्यांचे पैसे थकल्याने अडचणी वाढल्या आहे. त्यात लग्नसराई तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गत खरिपात अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पन्नात घट आली. मात्र, शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केली. या हरभरा पिकाच्या भरवशावर आर्थिक अडचणी दूर होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर कमी असल्याचे चिंता वाढली होती. त्यानंतर नाफेडच्या माध्यमातून हमीदराने हरभरा खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करून एक महिना लोटला आहे.

मात्र, अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा प्रकार सर्वाधीक आहे. या बाजार समिती अंतर्गत विविध गावातील ८५० शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाला. त्यानुसार शेतकऱ्यांनी तेथे माल मोजमाप करून दिला. परंतु, एक महिन्यापासून पैसे आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर ऐन लग्नसराई आर्थिक संकट ओढावले आहे.