शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

थाई एअरवेज कंपनीला ग्राहक मंचने दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 10:38 IST

ग्राहक मंचने सर्व तथ्य तपासून या कंपनीला फटकारत ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शुक्रवारी दिला आहे.

अकोला : अकोला शहरातील एक दाम्पत्य थाई एअरवेज कंपनीच्या विमानाने थायलंड येथे फिरण्यासाठी गेले असता या कंपनीने योग्य त्या सुविधा न दिल्यामुळे विमान कंपनीच्याविरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. अकोला ग्राहक मंचने सर्व तथ्य तपासून या कंपनीला फटकारत ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शुक्रवारी दिला आहे.अकोल्यातील मुस्ताक फिरोज वाघ व डॉ. शिरीन मुस्ताक वाघ हे पत्नी हे पती-पत्नी डिसेंबर २०१९ मध्ये थायलंडला सुट्या घालविण्यासाठी गेले होते. थाई एअरवेज इंटरनॅशनल पब्लिक कंपनी या कंपनीने वाघ दाम्पत्याचे मुंबई येथून थायलंडचे २ लाख ४० हजार रुपयाची तिकिटे काढली होती. वाघ दाम्पत्याला दिलेल्या विमानाच्या सेवेमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच यांच्यासमोर वाघ यांनी तक्रार दाखल करून आर्थिक दावा ठोकला होता.या दाव्याचा निकाल देत ग्राहक मंच्याच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य सुहास आळशी, सदस्य उदयकुमार सोनवणे यांनी सदर दाव्यातील तथ्य तपासून थाई एअरवे या कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयाला ४५ दिवसांच्या आत तक्रारकर्त्यांना दिलेल्या सदोष सेवेबद्दल नुकसान भरपाई म्हणून नगदी ३० हजार रुपये देण्याचा आदेश दिला. तसेच ४५ दिवसांच्या आत पैसे न दिल्यास ९ टक्के व्याजाने सदर पैसे आकारण्याचा आदेश दिला. मुंबईस्थित या विमान कंपनीने दुय्यम प्रकारची सदोष सेवा दिली. ही बाब अर्जदाराचे वकील अ‍ॅड. सुमित महेश बजाज यांनी न्याय मंचच्या निदर्शनास आणून दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाconsumerग्राहकThailandथायलंड