शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी शेतकर्‍यांवर अटींचा भडिमार; पणन विभागाकडून अद्यापही तारीख निश्‍चित नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 18:39 IST

अकोला : शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने किमान आधारभूत दराने ‘एफएक्यू’ (फेअर अँव्हरेज कॉलिटी) दर्जाच्या तुरीची पणन महासंघाकडून खरेदी केली जाणार असली, तरी यासाठी शेतकर्‍यांवर अटींचा भडिमार करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या मापदंडानुसार योग्य प्रतीच्या मालाची खरेदी केली जाणार असली, तरी पणन महासंघाकडून अद्यापही तारीख निश्‍चित झाली नसल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्यावतीने पणन महासंघ खरेदी करणर शेतकर्‍यांची तूरकिमान आधारभूत दराने ‘एफएक्यू’ दर्जाच्या तुरीची खरेदी केली जाणारऑनलाइन नोंदणी बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने किमान आधारभूत दराने ‘एफएक्यू’ (फेअर अँव्हरेज कॉलिटी) दर्जाच्या तुरीची पणन महासंघाकडून खरेदी केली जाणार असली, तरी यासाठी शेतकर्‍यांवर अटींचा भडिमार करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या मापदंडानुसार योग्य प्रतीच्या मालाची खरेदी केली जाणार असली, तरी पणन महासंघाकडून अद्यापही तारीख निश्‍चित झाली नसल्याची माहिती आहे. गतवर्षी राज्यात तूर खरेदीच्या मुद्यावरून शासनाच्या तूर खरेदी केंद्रांवर चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तूर खरेदीची हमी दिल्यामुळे शेतकर्‍यांनी तुरीचा पेरा वाढवला होता. यंदा हा गोंधळ टाळण्यासाठी पणन महासंघाकडून तूर खरेदी केली जाणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट केले जात असतानाच योग्य प्रतीच्या मालासाठी शेतकर्‍यांना विविध अटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले जात आहेत. यावर्षी केंद्र शासनाने तुरीची आधारभूत किंमत बोनससह ५ हजार ४५0 रुपये प्रतिक्विंटल निश्‍चित केली आहे. खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या मापदंडानुसार ‘एफएक्यू’ प्रतीचा माल आणणे बंधनकारक आहे. शिवाय, त्या मालाची चाळणी करून तसेच पूर्णत: वाळवून आणणे गरजेचे आहे. त्याचा ओलावा (आर्द्रता) १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसण्याची अट नमूद आहे. सद्यस्थितीत तूर उत्पादक क्षेत्रात तूर सोंगणीचा हंगाम सुरू आहे. तूर काढल्यानंतर ती वाळवत घालणे, नंतर चाळणी करणे व पुन्हा पोत्यात घालून खरेदी केंद्रावर पाठविण्यासाठी लागणार्‍या खर्चात वाढ होते. अशा तुरीची आद्र्रता निकषानुसारच राहील, याची कोणतीही शाश्‍वती नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत. पणन विभागाकडून पुढील आठवड्यानंतर तूर खरेदीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. 

ऑनलाइन नोंदणी बंधनकारकतूर विक्रीसाठी खरेदी केंद्र अथवा बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांना ऑनलाइन नोंदणी क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सात-बाराचा उतारा, आधार कार्ड व बँक  पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावी लागेल. त्यानंतर तुरीचा माल आणण्यासाठी तसेच खरेदीचा दिनांक व वेळेची माहिती ‘एसएमएस’द्वारे शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार