शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित प्रवर्गातील सदस्य नसल्याने दहा सरपंचांची पदे रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 10:43 IST

Sarpanch Election आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने जिल्ह्यात दहा सरपंचांची पदे रिक्त राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.

अकोला  : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १०६ सरपंच, ११६ उपसरंपचांची निवड अकोला: सार्वत्रिक निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ११६ सरपंच व उपसरंपचपदांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये १०६ सरपंच व ११६ उपसरंपचांची निवड करण्यात आली असून, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने जिल्ह्यात दहा सरपंचांची पदे रिक्त राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंचपदांच्या आरक्षणानुसार जिल्ह्यात ११६ सरपंचांपैकी १०६ सरपंचांची निवड करण्यात आली असून,११६ उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंचपदांच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नसल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील २ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८ सरपंचांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात दहा सरपंचांची पदे रिक्त राहिल्याचे चित्र आहे.

 

ग्रामपंचायत व प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली अशी आहेत सरपंचपदे!

तालुका             ग्रा.पं.             प्रवर्ग

अकोट             चोहोट्टा बाजार अनूसूचित जाती

अकोट             सावरा             अनूसूचित जमाती (स्त्री)

अकोट             मकरमपूर             अनुसूचित जाती

तेल्हारा             चांगलवाडी अनूसूचित जमाती

तेल्हारा             वांगरगाव             अनुसूचित जमाती (स्त्री)

अकोला             खांबोरा             अनूसूचित जमाती (स्त्री)

पातूर             आलेगाव             अनुसूचित जमाती

पातूर             विवरा             अनूसूचित जमाती(स्त्री)

पातूर             दिग्रस खुर्द            अनूसूचित जमाती(स्त्री)

पातूर             चरणगाव             अनूसूचित जमाती (स्त्री)

..

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच