शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१३४ अस्थायी पदांना तात्पुरता दिलासा!

By admin | Updated: March 23, 2017 02:16 IST

१३४ वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, आता ते ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंंत सेवा देणार आहेत.

वाशिम, दि. २२- अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणार्‍या पाच जिल्ह्यांतील ग्रामीण रुग्णालयांत अस्थायी सेवा देणार्‍या १३४ वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, आता ते ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंंत सेवा देणार आहेत.ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना मोफत व अत्यल्प दरात वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांची निर्मिती केली आहे. अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील आरोग्यविषयक कारभार पाहिला जातो. या पाच जिल्ह्यांत एकूण ४६ ग्रामीण रुग्णालय असून, येथे मोठय़ा संख्येने वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. काही पदे रिक्त असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात व्यत्यय निर्माण होतो. या पृष्ठभूमीवर शासनाने तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार ४६ ग्रामीण रुग्णालयांत तात्पुरत्या स्वरूपात १३४ वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची अस्थायी सेवा घेतली जात आहे.४६ ग्रामीण रुग्णालयातील या १३४ अस्थायी पदांची मुदत २८ फेब्रुवारी २0१७ पर्यंंत होती. मुदतवाढ नसल्याने अस्थायी पदांवर सेवा देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांपुढे पेच निर्माण झाला होता. या अस्थायी पदांची सेवा आणखी वाढविण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला होता. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मार्च रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, सर्व अस्थायी पदांना ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना १३४ अस्थायी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला. ग्रामीण रुग्णालयांतील १३४ अस्थायी पदांना शासनाने मुदतवाढ दिल्याच्या वृत्ताला अकोला मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दुजोरा दिला आहे.