शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा : तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:21 IST

तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पंचायत समिती सदस्यासह १४ जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देपं. स. सदस्यांसह १४ जणांविरु द्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पंचायत समिती सदस्यासह १४ जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पातुर्डा येथील सुभाष हरिभाऊ इंगळे यांनी तेल्हारा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी शेतातून टॅक्टर व टॉली खाली करून परत येत असताना ज्ञानेश्‍वर गजानन गव्हाळे, गोपाल कैलास वसतकार, भगवान भरत वसतकार, किसन कैलास वसतकार यांनी संगनमत करून माझा टॅक्टर अडवला. तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. या प्रकरणी इंगळे यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम ३४१, २९४,५0६,३४ नुसार गुन्हा दाखल केला. दुसर्‍या गटाच्या ज्ञानेश्‍वर गव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पंचायत समिती सदस्य राजू इंगळे, शुभम इंगळे, विशाल सपकाळ, विशाल इंगळे, रामू पाचपोर, सुभाष इंगळे, दिनकर इंगळे, भगवान इंगळे, अविनाश इंगळे, गजानन इंगळे यांनी सार्वजनिक रस्त्याच्या खोदकामावरून आपल्याबरोबर वाद घातला. तसेच गैरकायदेशीर मंडळी जमवून लोखंडी पाइपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी १0 जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात जमादार अनिल खिल्लारे, गजानन राठोड करीत आहेत.

टॅग्स :Telharaतेल्हाराCrimeगुन्हा