शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘तेजस्विनी’ !

By admin | Updated: June 19, 2015 02:24 IST

शासनाचा पुढाकार ; प्रकल्प व्यवस्थापनासाठी सहा कोटींचा निधी.

खामगाव (जि. बुलडाणा) : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत राज्यात महिला बचतगटांची संख्या वाढत असल्याची सकारात्मक बाब लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रकल्प व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने १७ जून रोजी सहा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने २0 जानेवारी २00३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाची पुर्नरचना करण्यात आली. पुर्नरचनेच्या वर्षांपासूनच मविमला (महिला आर्थिक विकास महामंडळ) प्रशासकीय खर्चासाठी दरवर्षी आवश्यकतेनुसार व्यवस्थापकीय अनुदान देण्यात येते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणून ग्रामीण भागात महिला बचत गटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी २00७ पासून आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र, राज्य आणि आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी यांच्यातील करारानुसार संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. दरम्यान, सन २0१४-१५ या वित्तीय वर्षांत मविमला वितरीत करण्यात आलेल्या १२.११ कोटी निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनास सादर केले आहे. त्यामुळे आता सन २0१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी सहा कोटी चार लाख चौतीस हजार रुपयांचे व्यवस्थापकीय अनुदान मंजूर केले आहे.

* तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत प्रकल्प व्यवस्थापनासाठी सन २0१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी ९ कोटी ८0 लक्ष रुपयांची तरतूद मंजूर आहे. यापैकी ८१ लक्ष ६६ हजार रुपयांची तरतूद महिला आर्थिक विकास महामंडळास करण्यात आली. तेजस्विनी कार्यक्रमातंर्गत प्रकल्प व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी ११0 नियमित पदांसह १६0 करार तत्वांवरील अशा एकुण २७0 पदांनाही मान्यता देण्यात आली आहे.