शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे तांत्रिक आॅडिट, ‘अमृत’च्या कामाची चौकशी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:38 IST

अकोला : शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार असून, अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देअकोल्यातील रस्ते कामांचेही तांत्रिक आॅडिट करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. कामाची चौकशी करण्यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अकोला : शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार असून, अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले; मात्र, त्यासोबतच शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक आॅडिट केले पाहिजे. शासन निर्णयानुसार मुंबईतील ३५० रस्ते कामांचे तांत्रिक आॅडिट करण्यात आले असून, अकोल्यातील रस्ते कामांचेही तांत्रिक आॅडिट करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पृष्ठभूमीवर अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम निकषाप्रमाणे होत आहे की नाही, पाइपची साईज (आकार) निकषाप्रमाणे आहे की नाही, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक आॅडिट आणि अमृत योजनेच्या कामाची चौकशी करण्यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसंदर्भातही तक्रारी असून, त्याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर उपस्थित होते.सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण आणि पुन्हा काँक्रिटीकरण!शहरातील रस्ते कामांसंदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी असून, त्यामध्ये पहिले सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, अशाही तक्रारी असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.मनपाने जबाबदारी ढकलून चालणार नाही!शहरातील रस्ते कामांसंदर्भात जिल्हाधिकाºयांनी बजावलेल्या नोटीसनुसार महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सादर केलेल्या स्पष्टीकरणात, रस्त्यांच्या ‘क्युरिंग’ कालावधीत नागरिकांनी वाहनांची ये-जा केल्याने रस्ते खराब झाल्याचा दावा केला आहे. परंतु, रस्ते कामांसंदर्भात शहरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मनपाने आपली जबाबदारी दुसºयावर ढकलून चालणार नाही, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाguardian ministerपालक मंत्री