शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कॉल ड्रॉपच्या तपासणीसाठी डीओटी टर्म सेलची टीम दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 14:12 IST

डीओटी टर्म सेलची (डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम्युनिकेशन) टीम शोध घेत असून, ही टीम दोन दिवसांपासून अकोल्यात दाखल आहे.

- संजय खांडेकर

 अकोला: गत काही महिन्यांपासून सेल्युलर मोबाइलचे कॉल ड्रॉप होत आहेत. ही समस्या सर्वच मोबाइल सेल्युलर कंपन्यांच्या ग्राहकांना भेडसावत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी डीओटी टर्म सेलची (डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम्युनिकेशन) टीम शोध घेत असून, ही टीम दोन दिवसांपासून अकोल्यात दाखल आहे. अकोला-वाशिम परिसरातील मोबाइल टॉवर्सची रेंज अत्याधुनिक मीटरने तपासून नेटवर्क तपासले जात आहे. यादरम्यान अतिरिक्त रेडिएशनचा वापर आढळल्यास त्या कंपनी टॉवर्सवर आणि आॅपरेटरवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.गेल्या काही दिवसांपासून कॉल ड्राप होण्याचे आणि कॉल न लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या काही जाणकारांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर धोत्रे यांनी याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, अकोल्यापासूनच कॉलड्रॉपच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. डीओटी टर्म सेलचे नागपूरचे तज्ज्ञ पथक दोन दिवसांपासून अकोल्यात दाखल झाले असून, त्यांनी गुरुवारी तेल्हारा तालुक्यातील नेटवर्कची तपासणी केली. टेस्टिंग मीटर लावून मोबाइल टॉवर्सच्या क्षमतेची रेंज तपासली. ज्या ठिकाणी लेव्हल डाऊन आढळली तेथे ती उंचाविण्याच्या नोंदी घेतल्या गेल्यात. नागपूरच्या पथकाकडून तपासणी होत असल्याचे लक्षात येताच सक्रिय असलेल्या बीएसएनएलसह रिलायन्स, आयडिया-वडाफोन आणि एअरटेल या चारही कंपनीचे आॅपरेटर्स सतर्क झाले आहे.मोबाइल टॉवर्सच्या कमतरतेमुळे समस्यारिलायन्सने सुरू केलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे अनेक सेल्युलर कंपन्या बंद पडल्या. काही इतर कंपन्यांमध्ये मर्ज झाल्यात. टू-जीच्या तुलनेत फोरजीच्या टॉवर्सची संख्या वाढविणे गरजेचे असते; मात्र सेवा फोर-जीची आणि सिंग्नल टॉवर्स (टू-जी) कालबाह्य असल्याने सेवा विस्कळीत होत आहे. त्या अंगानेदेखील तपासणी सुरू आहे. गत दोन दिवसांपासून डीओटी टर्म सेलची टीम अकोल्यात आली असून, ते कॉलड्राप संदर्भातील रेंजची तपासणी करीत आहे. अकोला जिल्ह्यातील तपसणी झाल्यानंतर ते वरिष्ठांकडे त्यांचा अहवाल सादर करतील. याबाबत आम्हाला त्याची माहिती मिळत नसते.- पवनकुमार बारापात्रे, महाप्रबंधक, अकोला-वाशिम.

 

टॅग्स :AkolaअकोलाBSNLबीएसएनएल