शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थिनींशी शिक्षकाचे लैंगिक चाळे

By admin | Updated: April 3, 2016 15:43 IST

समाजात मानाचे स्थान पटकाविणार्‍या शिक्षकाने शाळकरी विद्यार्थिनींना मोबाईलमधून अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला.

 ऑनलाइन लोकमत 

आमगाव, दि. ३ -  विद्यादानाचे पवित्र कार्य करीत गुरू म्हणून समाजात मानाचे स्थान पटकाविणार्‍या शिक्षकाने शाळकरी विद्यार्थिनींना मोबाईलमधून अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडवून शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्‍या शिक्षकाला शनिवारी अटक करण्यात आली.
आमगाव पंचायत समितीअंतर्गत तिगाव केंद्रामधील फुक्कीमेटा या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. तिथे इयत्ता तिसरीचा वर्गशिक्षक रमेश जयपाल पटले (५0) हा तिसरीत शिकणार्‍या सहा अल्पवयीन विद्यार्थिनींना मागील १५ दिवसांपासून आपल्या मोबाईलमधून अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत होता. कधी समूहात तर कधी एकांतात तो विद्यार्थिनींना चित्रफित दाखवायचा. मात्र शिक्षकाच्या भीतीने घाबरलेल्या त्या विद्यार्थिनी हा प्रकार निमूटपणे सहन करीत होत्या. त्यामुळे शिक्षकाचे मनोबल वाढले. मात्र हा प्रकार वाढल्यानंतर मुलींनी त्याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. हा प्रकार कळताच पालकांमध्ये तीव्र संताप पसरला. दरम्यान, गावात इतरही लोकांमध्ये ही खबर पसरली. विद्यार्थिनींचे पालक व नागरिकांनी लागलीच शाळेकडे धाव घेतली.
घडलेल्या प्रकाराबद्दल पालकांनी शिक्षक रमेश पटले याला विचारणा केली असता त्याने शाळेतच आपले कृत्य कबुल केले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी कवळीटोला येथील रहिवासी असलेल्या त्या शिक्षकाला भादंवि कलम ३५४ अ, ८, १0 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.