शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यास नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:34 IST

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचा आदेशसुद्धा दिला असताना, अमरावती विभागात मात्र नगर परिषद, मनपा शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नाही.

अकोला: राज्यातील खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगर परिषद, मनपा शाळांमधील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचा आदेशसुद्धा दिला असताना, अमरावती विभागात मात्र नगर परिषद, मनपा शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नाही. याउलट नागपूर व कोल्हापुरात मात्र वेतन देयके स्वीकारण्यात येत असल्यामुळे एकाच राज्यातील शिक्षकांना वेगवेगळा न्याय का, असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.शासनाने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शिक्षकांचे वेतन निश्चितीची संरचना करण्यास शिक्षण विभागास बजावले होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश विभागांमध्ये त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे. नागपूर, कोल्हापूर विभागातही शिक्षकांची वेतन देयके सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत; परंतु अमरावती विभागच त्याला अपवाद ठरला आहे. शासनाचा निर्णय असतानाही अमरावती विभागातील शिक्षकांची वेतन देयके सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नसल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे राज्यातील शिक्षकांना वेगवेगळा न्याय का लावला जात आहे, असा सवाल शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात शुक्रवारी शिक्षक महासंघाचे भोयर यांनी नगर विकास उपसचिवांची भेट घेतली आणि त्यांना शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक