शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अशैक्षणिक कामासाठी केली जाणाऱ्या सक्तीच्या निषेधार्थ शिक्षकांचे धरणे आंदोलन

By रवी दामोदर | Updated: November 10, 2023 18:04 IST

नवसाक्षरता अभियानांतर्गत कोणत्याही कामाची सक्ती करू नये : शिक्षक समन्वय समितीची मागणी

अकोला : नवसाक्षरता अभियानावर राज्यभर शिक्षक संघटनांचा बहिष्कार असताना जिल्ह्यात नवसाक्षरता अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना सक्ती केल्या जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षक समन्वय समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्यासमोर शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आले.याप्रसंगी शिक्षक संघटना समन्वयक समितीच्यावतीने विविध मागण्या केल्या. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला. धरणे आंदोलन समन्वयक समितीचे शशिकांत गायकवाड, निमंत्रक देवानंद मोरे, समन्वय गोपल सुरे, सहनिमंत्रक श्याम कुलट, शंकर तायडे, विजय टोहरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

ह्या आहेत संघटनेच्या प्रमुख मागण्यानवसाक्षरता अभियान अंतर्गत कोणत्याही कामाची जि. प. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना सक्ती करू नये., नवसाक्षरता अभियानांतर्गत राबविण्याचे कार्यक्रम त्रयस्थ संस्थेमार्फत शिक्षक विभागाने राबवावे. शिक्षकांना यासाठी वेठिस धरू नये., नवसाक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेल्या मुर्तिजापूर, बार्शीटाकळी व इतर कोणत्याही पंचायत समितीमधील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर कोणतेही कार्यवाही करू नये., शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकाविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या शिक्षक समन्वयक संघटनेच्यावतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक