शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वावरच घाला घालणा-या 'टीईटी' रद्द करण्याची शिक्षकांची मागणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 13:36 IST

अकोला: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा २४ आॅगस्ट २0१८ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा व २ फेब्रुवारी २0१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे शुक्रवारी केली.

अकोला: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा २४ आॅगस्ट २0१८ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा व २ फेब्रुवारी २0१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे शुक्रवारी केली.शासनाच्या २८ आॅगष्ट २0१८ च्या शासन निर्णयानुसार १३ फेब्रुवारी २0१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण केली नसेल तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असे शासननिर्णयात नमुद होते. परंतू या शासन निर्णयाला आव्हान देत काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये रिट पिटिशन १९१३ याचिका दाखल केली असता, शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षण विभागानेच केल्यामुळे व त्यास मान्यताही दिल्यामुळे अशा नियुक्त्या शासनाला रद्दबातल ठरविता येणार नाही. नागपूर खंडपिठाने दिलेल्या या निर्णयाचे पालन करुन अशा शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येणार नाहित असे म्हटले असले तरी शासनाने याबाबत अद्यापपर्यंत कोणताच निर्णय घेतला नाही. शिक्षकांच्या नियुक्त्या या शिक्षण विभागाची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच व मान्यता मिळाल्या नंतरच झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या सेवा समाप्त करणे कितपत योग्य आहे? असा सवाल शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उपस्थित करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. त्यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष मनोज कडू, मोहन ढोके, प्रा.सुधाकर गावंडे, पी.आर.ठाकरे, नितीन टाले, राहुल मोहोड, सूर्यकांत बाजड, अजयसिंह बिसेन, अतुल ठाकरे, रविंद्र मोहोड, किशोर नवले आदी शिक्षक बांधव उपस्थि होते.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र