शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

शिक्षक घामाघूम; शाळेसाठी विद्यार्थीच सापडेना!

By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST

अकोला मनपा शिक्षण विभाग उदासीन; आयुक्तांचे दुर्लक्ष

अकोला : येत्या २६ जूनपासून शालेय सत्राला सुरुवात होणार आहे. मनपा प्रशासनाने बालवाडी व सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू करण्यासाठी आखडता हात घेतल्याने शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांवर घामाघूम होण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या २0 दिवसांचा अवधी शिल्लक असताना, शिक्षकांना विद्यार्थीच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास अनेक शाळांवर समायोजनाची कुर्‍हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेच्या शाळा येत्या २६ जूनपासून सुरू होतील. खासगी कॉन्व्हेंटच्या तुलनेत मनपा शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुमार असण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे धोरण कारणीभूत असल्याचे उघड होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत असताना, स्थानिक स्वराज्य संस्था मात्र शिक्षण प्रणालीत कोणताही फेरबदल करण्यास तयार नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. बहुतांश मनपा शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे व शासनाच्या योजनांचा वेळोवेळी लाभ पोहोचविणे शिक्षण विभागाचे नैतिक कर्तव्य आहे. मनपाच्या रटाळ शिक्षण प्रणालीमुळे सर्वसामान्य कुटुंबांनी मनपाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत असून, मनपा शाळांसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना शिक्षकांची प्रचंड दमछाक होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षण प्रणालीत बदल करण्याची आवश्यकता असताना, या मुद्याकडे मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांचे दुर्लक्ष होत आहे.