शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे शिक्षक संघटनांमध्ये आंदोलनाची चढाओढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:28 IST

, नागपूर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांना घेऊन अमरावती विभागातील शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विभागातील शिक्षक संघटना व शिक्षक नेते कामाला लागले आहेत. शिक्षकांच्या समस्या, प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची चढाओढ लागली असून, नागपूर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांना घेऊन अमरावती विभागातील शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.जुनी पेन्शन योजना, प्रतिविद्यार्थीप्रमाणे शिक्षकांना वेतन देण्यासाठी, शाळा एकत्रीकरणासाठी स्थापन झालेला अभ्यासगट, निवड वेतनश्रेणीचा प्रश्न, पात्र घोषित, अघोषित शाळा, महाविद्यालयांचे अनुदान, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, टीईटी अट शिथिल करावी, यासह इतर प्रश्न शिक्षकांसमोर उभे आहेत. शिक्षक संघटना केवळ नावापुरत्या आंदोलनाची भूमिका घेतात. आता अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत. निवडणुकीपुरत्याच अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षक नेते उदयास येतात. निवडणूक संपली की संघटना आणि शिक्षक नेते गायब होतात. निवडणूक तोंडावर आल्यावर अचानक जिवंत झालेल्या शिक्षक संघटनांना शिक्षकांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव होते. सध्या अमरावती विभागात शिक्षक संघटनांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. पाचही जिल्ह्यांत शिक्षक संघटना उभ्या राहिल्या असून, शिक्षकांच्या समस्यांना घेऊन या संघटना नागपूर विधिमंडळावर धरणे आंदोलन करीत आहेत. सर्वच शिक्षक संघटनांना सध्या शिक्षकांचा चांगलाच पुळका आलेल्या दिसून येत आहे.शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि आम्हीच तुमचे तारणहार असल्याचे दर्शविण्यासाठी शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विभागामध्ये भाजप शिक्षक सेल, शिक्षक आघाडी, राज्य शिक्षक परिषद, विज्युक्टा, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक महासंघ, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, खासगी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना आदी संघटना सध्या आंदोलनाच्या मैदानात उतरल्या आहेत.या सर्व संघटनांकडून या आठवड्यात नागपूर विधिमंडळावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. शिक्षकांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी या संघटनांमध्ये अक्षरश: चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे; परंतु येणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदार कोणत्या शिक्षक संघटनेच्या पाठीशी उभे राहतात, कोणत्या संघटनेच्या उमेदवाराला साथ देतात, हे सांगणे सध्यातरी कठीण असले तरी, शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मात्र जोरकसपणे सुरू आहेत.

निवडणूक लढविण्यासाठी या संघटना उत्सुकशिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शिक्षक आघाडीसोबतच शिक्षक महासंघ, विज्युक्टा, विमाशिसं, राज्य शिक्षक परिषद, भाजप शिक्षक सेल, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना आदी संघटनांचे शिक्षक नेते उत्सुक असून, या संघटनांनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. या शिक्षक संघटनांपैकी काहींचे उमेदवारसुद्धा जाहीर झाले असून, हे उमेदवार पाचही जिल्ह्यांमध्ये फिरून शिक्षकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक