शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात शिक्षकाचा विष घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 10:12 IST

हा प्रकार घडत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनीही शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली.

अकोला : शामकी माता प्राथमिक शाळा पिंजर येथे कार्यरत असताना मार्च २०१५ पासून थांबविलेले वेतन मिळावे, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास देयक सादर करण्याचे निर्देश द्यावे, या मागणीसाठी सहायक शिक्षक प्रवीण गणेश चव्हाण यांनी पत्नीसह शिक्षणाधिकारी कार्यालयातच विष घेण्याची तयारी केली. शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सुनावणी घेत संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. हा प्रकार घडत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनीही शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली.या सुनावणीसाठी शिक्षकाने लेखी जबाब सादर केला. त्यामध्ये शाळेतील डिगांबर किसन गिºहे यांचा सेवासातत्याचा प्रस्ताव खोटा व बनावट आहे. त्यासाठी लेटरपॅड व माझ्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे तो प्रस्ताव रद्द करावा, मार्च २०१५ पासून नियमित कामासोबतच मुख्याध्यापकाचा प्रभारही सांभाळला. तरीही वेतन थांबविले आहे. दरम्यान, हे प्रकरण अमरावती येथील शाळा न्यायाधीकरणात सुरू आहे. त्या प्रकरणात गिºहे २००७ ते २०१५ या कालावधीत सतत गैरहजर आहेत. ही बाब चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे चुकीचा निकाल लागला. आपणाला शिक्षण विभागाने सेवेतून अद्यापही कमी केलेले नाही.शाळेच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरत असल्यास समायोजन करावे, या मागणीसाठी शिक्षकाने शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली. प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सातत्याने खोटे बोलतात. त्यांची आर्थिक मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी गिºहे नामक शिक्षकासाठी हा सगळा खटाटोप केला आहे. कुटुबांची परिस्थिती हलाखीची असल्याने आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक