शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

 क्षयरुग्णांना सकस आहारासाठी मिळणार ५०० रुपये अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:58 IST

अकोला: सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजना भारत सरकारद्वारे १ एप्रिल २०१८ पासून सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत प्रत्यक्ष क्षयरुग्णास पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

ठळक मुद्देनव्याने निघालेल्या क्षयरुग्णांना ६ महिने, या आधी उपचार घेतलेल्या रुग्णांस ८ महिने व एमडीआर क्षयरुग्णांना २४ महिने पोषण आहाराकरिता ५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश गाव, शहर, तालुका, जिल्हा व देश क्षयमुक्त करण्याची संकल्पना साध्य करण्याचा आहे.याकरिता प्रत्येक क्षयरुग्णांनी आपले आधारकार्ड व बँकेची संपूर्ण माहिती आपल्या जवळच्या प्रा.आ. केंद्रात सादर करणे आवश्यक आहे.

अकोला: सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजना भारत सरकारद्वारे १ एप्रिल २०१८ पासून सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत प्रत्यक्ष क्षयरुग्णास पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०१८ नंतर निघणाऱ्या प्रत्येक क्षयरुग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल.या योजनेंतर्गत १ एप्रिलला औषधोपचार घेत असलेले क्षयरुग्ण तसेच १ एप्रिलनंतर निघालेल्या सर्व क्षयरुग्णांना पोषण आहाराकरिता ५०० रु. प्रतिमहिना (दरमहा) औषध सुरू असेपर्यंत मिळणार आहे. म्हणजेच नव्याने निघालेल्या क्षयरुग्णांना ६ महिने, या आधी उपचार घेतलेल्या रुग्णांस ८ महिने व एमडीआर क्षयरुग्णांना २४ महिने पोषण आहाराकरिता ५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. ही रक्कम आॅनलाइन पद्धतीने थेट क्षयरुग्णांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. याकरिता प्रत्येक क्षयरुग्णांनी आपले आधारकार्ड व बँकेची संपूर्ण माहिती आपल्या जवळच्या प्रा.आ. केंद्रात सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गाव, शहर, तालुका, जिल्हा व देश क्षयमुक्त करण्याची संकल्पना साध्य करण्याचा आहे. क्षयरुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याकरिता औषधोपचारासोबतच त्यांना सकस आहराची नितांत गरज असते. त्याकरिता केंद्र्र शासन १ एप्रिल २०१८ पासून क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजनेंतर्गत अर्थसहाय्य म्हणून दरमहा ५०० रु. क्षयरुग्णांना देण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे (ट्रिटमेंटर सर्पोटर) क्षयरुग्णांना औषधोपचार देणाºयांना क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर प्रती क्षयरुग्ण १००० व एमडीआर क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर ५००० रु. प्रती रुग्ण याप्रमाणे योजनेचा लाभ मिळणार आहे.खासगी वैद्यकीय व्यावसायिक मिळणार फायदाखासगी डॉक्टरांकडे निघणाºया क्षयरुग्णांची माहिती त्यांनी शासनास कळविणे आवश्यक आहे. क्षयरोग हा ७ मे २०१८ चे शासन आदेशाद्वारे ‘नोटीफाय डिसीस’ जाहीर झालेला आहे. त्याद्वारे प्रत्येक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे तसेच खासगी लॅब, मल्टीहॉस्पिटलमध्ये निघणाºया क्षयरुग्णांची माहिती नोटीफिकेशन फॉरमॅटमध्ये आरोग्य खात्यास (जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास) देणे बंधनकारक आहे. नोटीफाय फॉरमॅटमध्ये क्षयरुग्णांची माहिती सादर झाल्यानंतर प्रती क्षयरुग्ण ५०० प्रमाणे तसेच क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर प्रती क्षयरुग्ण ५०० प्रमाणे खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना दिले जाईल. यासाठी क्षयरुग्ण नोटीफाय करणाºया डॉक्टरांनी आपले आधार नंबर व बँकेचा तपशील जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अकोला यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.शासनाद्वारे क्षयमुक्त भारत अभियान सुरू असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त क्षयरुग्णांनी व खासगी डॉक्टरांनी घेऊन क्षयरोगमुक्त अकोला या अभियानात सहभागी व्हावे. - डॉ. मेघा गोळे , जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य