शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

८७५ पायदळ वार्‍या करणारे टेलरमामा!

By admin | Updated: February 11, 2015 01:18 IST

वारी शेगावाची करी जो भक्त, तयासी अनंत सांभाळीत..गजानन भक्तीचे असेही वेड.

नितीन गव्हाळे / अकोला:देव आणि भक्ताचे एक नाते आहे. परंतु या नात्यात स्वार्थच अधिक आहे. निस्वार्थ भक्ती आता क्वचितच दिसून येते. शेगावीचे संत गजानन महाराज म्हणजे वैदर्भीय भाविकांचे श्रद्धास्थान. गजाननावर असलेल्या श्रद्धेपोटीच हजारो लोक पायदळ वार्‍या करतात. या पायदळ वार्‍यांमागेही काही ना काही भावना दडलेली असते. प्रत्येकजण काहीतरी मागणे घेऊनच संत गजाननाच्या दरबारात जातो. परंतु गजाननाचा एक भक्त कोणतीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थ, निर्मळ भावनेतून अविरत पायी वारी करतो आहे. आतापर्यंत या भक्ताने शेगावीच्या ८७५ पायदळ वार्‍या केल्या आहे. या भक्ताचे नाव आहे, टेलरमामा ऊर्फ मधुकर त्र्यंबकराव राजूरकर.लोक त्यांना आदराने टेलरमामा म्हणतात. टेलरमामा मूळचे शेलुबाजारचे राहणारे. त्यांचे वडील शेतकरी होते. सातव्या वर्गापर्यंंत शिक्षण झालेल्या टेलरमामांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. गावात ते टेलरकाम शिकले. परंतु तेथे राहून पोट भरणार नव्हते. म्हणून १९७0 च्या सुमारास ते अकोल्यात आले. देशमुख फैलात त्यांनी आपले बस्तान मांडले. टेलर काम करून संसार उभा केला. हळूहळू स्वतचे घरही उभे केले. अशातच त्यांना शेगावीच्या राणाची ओढ लागली. शेगावीला जाणे-येणे वाढले. श्रींच्या भक्तीने त्यांच्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण केली. गेल्या १४ वर्षांंपासून टेलरमामा शेगावीच्या पायी वार्‍या करताहेत. त्यांच्या वारीत खंड पडलेला नाही. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बागळता हा गजानन भक्त पायी वार्‍या करतो आहे. दर गुरुवारी केवळ चहा घेऊन टेलरमामा शेगावीसाठी निघतात. आतापर्यंंत त्यांनी ८७५ शेगावीच्या पायदळ वार्‍या केल्यात.