शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सवाढ विरोधी याचिका : मनपाने मागितला न्यायालयाकडे अवधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:20 IST

अकोला: काँग्रेस पक्षाचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी करवाढीला आव्हान देत नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता, महापालिका प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली.

अकोला: काँग्रेस पक्षाचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी करवाढीला आव्हान देत नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता, महापालिका प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली. त्यावर उच्च न्यायालयाने सात दिवसांचा अवधी दिला.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत २०१६ मध्ये सुधारित करवाढ लागू केली. ही करवाढ नियमानुसार नसल्याचा आक्षेप घेत काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी मनपाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर हायकोर्टाने २२ मार्च २०१८ रोजी मनपा प्रशासनाला नोटीस जारी करीत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यावर मनपा प्रशासनाने शपथपत्राद्वारे बाजू मांडणे अपेक्षित होते. न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेत प्रशासनाने शपथपत्र सादर केले नाही. शपथपत्र सादर करण्यासाठी प्रशासनाने वारंवार मुदत मागितली. त्यानंतर शपथपत्र सादर केले. याप्रकरणी १६ जानेवारी रोजी सुनावणी पार पडणार होती. १७ जानेवारी रोजीच्या सुनावणी दरम्यान महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या विधिज्ञांनी द्विसदस्यीय खंडपीठाकडे बाजू मांडण्यासाठी पुन्हा मुदत देण्याची विनंती केली. त्यानुषंगाने प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आली.बाजू भक्कम असल्याचा प्रशासनाचा दावाकाँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रशासन काय भूमिका स्पष्ट करते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. सुधारित करवाढ नियमानुसार असून, न्यायालयात बाजू भक्कम असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. अशा स्थितीत मनपाने बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे आणखी मुदत का मागितली, असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका