शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांवर करवाढीचे संकट!

By admin | Updated: August 12, 2015 01:41 IST

१00 कोटींचे उत्पन्न मिळणार; महापालिका प्रशासनाच्या भूलथापा.

आशीष गावंडे / अकोला: महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या सबबीखाली प्रशासनाने झोननिहाय मालमत्ता पुनर्मूल्यांकन मोहीम सुरू केली. या बदल्यात प्रशासन मूलभूत सुविधांची पूर्तता करणार, या विचारातून अकोलेकर सहकार्य करीत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन अकोलेकरांवर करवाढ लादण्याच्या तयारीत आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या मुद्यावर येत्या २२ ऑगस्टपर्यंत सभागृहाने निर्णय न घेतल्यास नियमानुसार अकोला शहरात ही कर प्रणाली लागू होणार असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे.महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत नसल्याने कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाची समस्या कायम आहे. ती निकाली काढण्यासाठी शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून नियमानुसार कर आकारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांना मोलाचा सल्ला देण्यात कर विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पुनर्मूल्यांकन प्रक्रिया आटोपल्यानंतर नागरिकांना नियमानुसार कर आकारल्यास मनपाच्या उत्पन्नात तब्बल १00 कोटींनी वाढ होण्याचा दावा काही अधिकारी करीत आहेत. तसे झाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. प्रशासनाची रास्त भूमिका लक्षात घेता, अकोलेकरदेखील मालमत्ता पुनर्मूल्यांकन मोहिमेला सहकार्य करीत आहेत. यादरम्यान, पुनर्मूल्यांकन मोहीम आटोपल्यानंतर मनपा क्षेत्रातील मालमत्तांना भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मे महिन्यात विषय सूचीमध्ये समाविष्ट केल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यावेळी या विषयावर सभागृहात चर्चा झाली नाही. सभागृहाने एखादा प्रस्ताव ९0 दिवसांच्या आत मंजूर न केल्यास आणि तो प्रशासनाला गरजेचा वाटल्यास संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे प्रशासनाला अधिकार आहेत. नेमका हाच प्रकार या ठिकाणी झाला असून, भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी या प्रस्तावाच्या प्रक्रियेला ९0 दिवसांचा अवधी पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी सभागृहाने विशेष सभा आयोजित करून या प्रस्तावाच्या संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास अकोलेकरांवर मोठय़ा प्रमाणात कर आकारणी केली जाईल, हे निश्‍चत आहे.