शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

आता घरी थांबूनच जमा करता येईल टॅक्सची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:26 IST

वसुली लिपिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला : संसर्गजन्य कोरोन विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी येत्या १४ एप्रिलपर्यंत सर्वत्र ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. याचा परिणाम मनपाच्या मालमत्ता कर वसुलीवर झाला असून, शहरातील धनाढ्य नागरिकांनीही कर जमा करण्यास हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घरी थांबूनच अकोलेकरांना मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी टॅक्स पावतीवर असलेल्या वसुली लिपिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महापालिकेकडे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने प्रशासनाची सर्वाधिक भिस्त मालमत्ता कर वसुलीवर राहते. २०१६ पर्यंत शहरातील मालमत्ताधारकांकडून प्रशासनाला जमतेम १८ कोटी रुपयांचा कर प्राप्त होत असे. उत्पन्न नगण्य असल्याने मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या पाचवीला पुजलेली होती. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांकडूनही वारंवार कामबंद आंदोलने छेडल्या जात असल्याचे चित्र होते. शहरातील मालमत्तांचे दर तीन वर्षांनंतर पुनर्मूल्यांकन होणे क्रमप्राप्त असताना १९९८ पासून ही प्रक्रिया ठप्प पडली होती. २०१६ मध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेत सुधारित करवाढ लागू केली. त्यानुसार मनपाला वार्षिक ६८ ते ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा प्रशासनाला अंदाज होता. त्यानुसार कर वसुली होत असल्यानेच मागील तीन वर्षांमध्ये थकीत वेतनाची समस्या निकाली निघाली. यंदा चालू आर्थिक वर्षात मार्च संपेपर्यंत प्रशासनाला १३५ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी मनपाने केवळ ४० कोटी रुपये वसूल केले. उर्वरित थकबाकीचा आकडा मोठा असताना ऐन कोरोना साथीच्या आजाराची सबब पुढे करून अकोलेकरांनी थकबाकी जमा करण्यास हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे.

घरोघरी जाऊन होणार थकबाकी वसूलमध्यंतरी शहरात परदेशातून तसेच मोठ्या शहरातून दाखल झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी कर वसुली विभागातील सहायक कर अधीक्षक, वसुली लिपिकांसह शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य निरीक्षकांची फौज कामाला लावली होती. सर्वेक्षणाची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यादरम्यान, नागरिकांनी कर जमा करण्यास हात आखडता घेतल्याने नागरिकांच्या घरोघरी जाऊन थकबाकी वसूल करण्यासाठी कर वसुली लिपिकांना पाठविण्याचे नियोजन केल्या जात असल्याची माहिती आहे.

संसर्गजन्य कोरोना विषाणूची आपत्ती टाळण्यासाठी मनपाच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रामुख्याने मनपाचे सफाई कर्मचारी, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा तसेच इतर विभागातील कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. अशा संकट समयी अकोलेकरांनी मालमत्ता कराची रक्कमजमा करून त्यांचे कर्तव्य निभावण्याची गरज आहे.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर