शेगाव: भरधाव वेगाने जाण्यार्या टाटा मॅजिक गाडीनेे समोरून येणार्या दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. हा अपघात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव-वरवट मार्गावर घडला.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यात असलेल्या रायखेड येथील भास्कर महादेव नेमाडे व त्यांच्या मुलगा शेखर भास्कर नेमाडे हे दोघे एम.एम.-३०, ए.के .४८६२ क्रमांकाच्या दुचाकीने खामगावकडे जात असताना शेगावहून वरवटकडे भरधाव वेगाने जाण्यार्या एम.एच.-२८, आर. ३०३७ क्रमांकाच्या टाटा मॅजिक गाडीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात भास्कर नेमाडे हे जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा शेखर गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला देण्यात आली असून, वृत्त लिहीत असेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. टाटा मॅजिक चालक भरधाव वेगाने व निष्काळजीने वाहन चालवित होता, असे वाहनातील प्रवासी सांगत होते.
टाटा मॅजिकचीे दुुचाकीला धडक; एक ठार
By admin | Updated: May 12, 2014 22:34 IST