शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपासमोर १८ हजार वृक्ष लागवडीचे ‘लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:27 IST

अकोला : महापालिक ा प्रशासनाला यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची अमरावती येथे विभागीय कार्यालयात बैठक पार पडली

ठळक मुद्देमनपा प्रशासनाला १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती आहे.मनपाच्या स्तरावर शहरातील १२ खुल्या भूखंडांवर हरित पट्टे निर्माण केले जात आहेत.शहराचे तापमान कमी होण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाला नक्कीच हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अकोला : महापालिक ा प्रशासनाला यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची अमरावती येथे विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. प्रशासनाने गतवर्षी वृक्षांची लागवड करताना ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला होता, हे विशेष. त्यामुळे गतवर्षात किती झाडे बहरली, याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.उन्हाळ््यात अकोला शहराचा चढलेला पारा अनेकांना असह्य ठरतो. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, ती कमी करण्यासाठी केवळ वृक्ष लागवड करणे व त्यांचे संगोपन करण्याचा एकमेव पर्याय आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने दरवर्षी पावसाळ््यात वृक्ष लागवडीची मोहीम राबवल्या जाते. गतवर्षी शहरात सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यावेळी झाडे लावत असताना बांधकाम विभागाच्यावतीने मोबाइलमधील ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर करून, त्यांची नोंद घेण्यात आली होती. यंदा मनपा प्रशासनाला १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे.गतवर्षीच्या वृक्षांचे काय झाले?मनपा प्रशासनाने गतवर्षी शहराच्या विविध भागात सहा हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांची मदत घेण्यात आली होती. तसेच महापालिका शाळेतील शिक्षकांना किमान पाच वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वृक्ष लागवड करताना त्यांची ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे नोंद घेणे बंधनकारक करण्यात आले होते. सहा हजारपैकी किती वृक्षांचे संगोपन झाले, याची माहिती समोर येण्याची गरज आहे.‘ग्रीन झोन’मध्ये १३ हजार वृक्ष लागवड१८ हजार वृक्षांपैकी १३ हजार वृक्षांची लागवड शहराच्या विविध भागातील निर्माणाधिन ‘ग्रीन झोन’मध्ये केली जाणार आहे. सद्यस्थितीत मनपाच्या स्तरावर शहरातील १२ खुल्या भूखंडांवर हरित पट्टे निर्माण केले जात आहेत. या ठिकाणी १३ हजार वृक्ष लावल्या जातील. यामुळे शहराचे तापमान कमी होण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाला नक्कीच हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका