शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:14 IST

अकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या ऐपतीपलीकडचा असल्याने या मुलाच्या भवितव्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याची गरज आहे.

ठळक मुद्देदोन्ही कीडनी निकामी झाल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. प्रत्यारोपणासाठी ६ लाख रुपयांचा खर्च असून डायलीसीससाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. प्रत्यारोपनाच्या खर्चासाठी समाजातील सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेतल्यास तनवीरला तातडीने उपचार मिळतील.

- सचिन राऊतअकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या ऐपतीपलीकडचा असल्याने या मुलाच्या भवितव्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याची गरज आहे.मो. तनवीर याचे वडील मोलमजुरीचे काम करतात. त्यांचा मुलगा तनवीरच्या दोन्ही कीडनी निकामी झाल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. मात्र तनवीरच्या कुटुंबीयांनी धीर न सोडता, त्याच्यावर उपचार सुरु केले. हातमजुरी करून तनवीरचे ‘डायलीसीस’ करण्यात येत आहेत. आतापर्यंत गोळा केलेली पै-अन-पै त्यांनी तनवीरच्या उपचारासाठी व डायलीसीससाठी खर्च केले. मात्र त्याचे वय केवळ ११ वर्ष असल्याने हे डायलीसीस त्याच्या जिवाला धोकादायक आहे. त्यामुळे तनवीरला किडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. चाचण्या सुरु केल्यानंतर किडनी प्रत्यारोपण होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले, मात्र किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रीयेचा खर्च सांगताच तनवीरच्या कुटुंबीयांवर पुन्हा एकदा संकट कोसळले. प्रत्यारोपणासाठी ६ लाख रुपयांचा खर्च असून डायलीसीससाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तनवीरला सोमवारी मुंबईतील जसलोक व जेजे हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. त्याच्या प्रत्येक डायलीसीससाठी तीन हजार रुपयांचा खर्च येत आहे. जिवाला धोका असतांनाही त्याचे कुटुंबीय डायलीसीस करीत आहे. मात्र प्रत्यारोपनाच्या खर्चासाठी समाजातील सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेतल्यास तनवीरला तातडीने उपचार मिळतील, आणि त्याच्या आईच्या किडनी प्रत्योरापनानंतर त्याला नवजीवन मिळणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले, मात्र गरज आहे ती आता त्याला समाजाच्या आर्थिक मदतीची.दानदात्यांनी पुढाकार घेण्याची गरज मुंबईतील सामाजिक संस्था व शासनाकडून किडनी प्रत्यारोपनासह डायलीसीससाठी तनवीरला मदत मिळणार आहे. मात्र या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रीया प्रचंड वेळ लागणाऱ्या आहेत. आणि तनवीरची किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रीया तातडीने करणे गरजेचे असल्याने या सामाजिक संस्था व शासनाची मदत त्याला वेळेत मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामूळेच समाजातील दानदात्यांनी तनवीरला आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तनवीरचे कुटुंबीय वाशिम बायपास परिसरातील इन्स्पेक्टर कॉलनीत रहिवासी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य