शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचे पाणी ‘कुपन’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:11 IST

जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांमध्ये टँकरद्वारे  पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाणी वाटपात  गावागावांत होणारे वाद टाळण्यासाठी आणि प्रती मानसी समान  पाणी वितरणाकरिता ‘कुपन’वर पाणी वाटप करण्याची प्रायोगिक  उपाययोजना घुसर या गावात ग्रामपंचायतमार्फत रविवारपासून  सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाद टाळण्यासाठी समान पाणी वाटपाची उपाययोजना

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांमध्ये टँकरद्वारे  पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाणी वाटपात  गावागावांत होणारे वाद टाळण्यासाठी आणि प्रती मानसी समान  पाणी वितरणाकरिता ‘कुपन’वर पाणी वाटप करण्याची प्रायोगिक  उपाययोजना घुसर या गावात ग्रामपंचायतमार्फत रविवारपासून  सुरू करण्यात आली आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू  असलेल्या इतरही गावात अशीच उपाययोजना राबविण्याचा प्रय त्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा प्रादेशिक पाणी  पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणी पुरवठा  करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने  योजनेंतर्गत गावांचा पाणी पुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद  करण्यात आला. त्यामुळे  खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनें तर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू  करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला.  त्यानुसार १0 सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला आहे. ६१ पैकी ४४ गावांमध्ये सध्या २५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाणी वाटपात कमी-जास्त  पाणी मिळण्यावरून वाद होऊ नये आणि  प्रती मानसी १00  लीटरप्रमाणे प्रती कुटुंबाला किमान ६00 लीटर पाणी मिळावे,  यासाठी अकोला तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त घुसर येथे ‘कु पन’वर टँकरचे पाणी वाटपाचा उपक्रम ग्रामपंचायतमार्फत सुरू  करण्यात आला आहे. वाद टाळण्यासाठी आणि समान पाणी  वाटपासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला असाच  उपक्रम टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार्‍या इतरही गावात  राबविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

नियमित पाणी पुरवठा करण्याचे निर्देश!टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणी पुरवठा  कामाचा आढावा सोमवारी अकोला तहसील कार्यालयात घेण्या त आला. दिवाळीच्या दिवसात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या  पाण्यासाठी ग्रामस्थांची अडचण होऊ नये, यासाठी नियमित  टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश अकोल्याचे प्रभारी उ पविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी या बैठकीत दिले.  नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित  ग्रामसेवकांची राहणार आहे.या बैठकीला तहसीलदार राजेश्‍वर  हांडे, गटविकास अधिकारी डॉ.दिलीप पाटील उपस्थित होते.

‘कुपन’वर असे होते पाणी वाटप!टँकरद्वारे पाणी वाटपासाठी अकोला तालुक्यातील घुसर येथे  ग्रामपंचायतमार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाला कुपन देण्यात  आले. टँकरद्वारे पाणी वाटपात प्रती मानसी १00 लीटरप्रमाणे प्र त्येक कुटुंबाला ६00 लीटरपर्यंत पाणी वाटप करण्यात येते. पाणी  वितरित केलेल्या तारखेलाच  संबंधित कुटुंबातील सदस्याची  ‘कुपन’वर स्वाक्षरी घेतली जाते.

६१ पैकी ४४ गावांनाच मिळाले टँकरचे पाणी!खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६१ गावांना टँकरद्वारे  पाणी पुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे;  मात्र आतापर्यंत ६१ पैकी ४४ गावांनाच २५ टँकरद्वारे पाणी  पुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित गावांना अद्यापही  टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही.

टँकरद्वारे पाणी वितरणात कमी-जास्त पाणी वितरणावरून होणारे  वाद टाळण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार सर्वांना पाणी  मिळावे, यासाठी घुसर या गावात प्रायोगित तत्त्वावर ‘कुपन’वर  पाणी वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशीच उ पाययोजना तालुक्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या  इतरही गावात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला.

टॅग्स :Waterपाणी