शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या डिझेलचा खर्च उधारीवर!

By admin | Updated: May 5, 2016 03:10 IST

अकोला जिल्ह्यातील सहा गावांत शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा; मात्र टँकरच्या डिझेलचा खर्च उधारीवरच असल्याचा प्रताप.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त सहा गावांमध्ये शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टँकरच्या डिझेलचा खर्च उधारीवर सुरू आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नसलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त सहा गावांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित सहा गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु पाणीपुरवठा करणार्‍या टँकरमध्ये डिझेल भरण्याचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या शासकीय टँकरमध्ये डिझेल भरण्याचा खर्च प्रशासनाला उधारीवर भागवावा लागत आहे. शासनमार्फत निधी उपलब्ध झाल्यानंतर टँकरच्या डिझेल खर्चाची देयके अदा करण्यात येणार आहेत.