शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ताकवाले समितीने केली होती जिल्हानिहाय विद्यापीठाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 10:45 IST

प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विद्यापीठांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी सन २०१३ मध्ये आघाडी सरकारने स्थापन केलेल्या प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.विद्यापीठांमधील कामाचा ताण वाढत असल्याने तसेच कार्यक्षेत्र मोठे असल्याने महाविद्यालयांच्या शैक्षणिक कार्यांवर नियंत्रण ठेवणे विद्यापीठांना अशक्य आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सन २०१३ मध्ये आघाडी सरकारने प्रा. राम ताकवाले यांची समिती स्थापन केली होती. या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. सद्यस्थितीत अनेक विद्यापीठांचे कार्यक्षेत्र चार ते पाच जिल्ह्यांमध्ये आहे. तसेच ४०० ते ५०० महाविद्यालये असल्याने विद्यापीठांचा एकही अधिकारी प्रत्यक्ष महाविद्यालयांना भेट देऊ शकत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या अकॅडमिक कामांवर विद्यापीठ नियंत्रण ठेवू शकत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. ही शिफारसही दुर्लक्षित राहिली आहे.

अकोल्यातून उभा राहिला होता लढा1 अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी अकोल्यातून २००७ मध्ये मोठा लढा उभा राहिला होता. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रा. सुभाष भडांगे, प्रा. मांडवगणे, प्रमोद बोर्डे, प्रा.अंबादास कुलट, प्रा. विजय नानोटी, सदाशिवराव शेळके आदी मंडळी यामध्ये अग्रेसर होती.2 विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. तब्ब्ल तीन वर्ष ही मागणी लावून धरल्यावर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी ११ फेब्रुवारी २००९ रोजी स्वतंत्र विद्यापिठाची मागणी मंजूरही केली होती; मात्र पुढे या मागणीचा विसर शासनाला पडला अन् विद्यापीठाची मागणी दुर्लक्षित राहिली.

ताकवाले समितीने बोलविलेल्या सभेत मी उपस्थित होतो. या समितीच्या शिफारसी उपयुक्त आहेत. सध्या अमरावती विद्यापीठाची स्थिती पाहता आणखी एक विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे.-प्राचार्य डॉ.आर.डी. सिकची

लहान विद्यापीठे ही गुणवत्तावृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात, हे सिद्ध झाले आहे. यशपाल कमिटीनेही याबाबत स्पष्ट शिफारस केली होती. त्यामुळे पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे उपयुक्तच ठरेल-प्राचार्य डॉ.जे.एम. साबू  

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र