शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमीत घ्या ! जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2023 16:41 IST

या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक समस्या तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमित घेण्यात याव्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सभेत दिले.

संतोष येलकर / अकोला

अकोला: जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमीत घेण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.जिल्हयातील ग्रामीण भागात आरोग्यविषयक समस्या आणि रुग्णांच्या अडचणी निकाली काढण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरांवर रुग्णकल्याण समित्या गठित करण्यात आल्या असल्या तरी, या रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमीत घेण्यात येत नसल्याच्या मुद्दयावर सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक समस्या तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमित घेण्यात याव्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सभेत दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीच्या सदस्य पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, प्रमोदिनी कोल्हे, प्रगती दांदळे आदींसह जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करा !पावसाळ्यात जिल्हयातील ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबतची खबरदारी घेवून, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आरोग्य सभापती संगीता अढाऊ यांनी या सभेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिल्या.