अकोला : शहरातील बेकायदेशीर आणि अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सशक्त पावले उचलून विनापरवाना वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश गुंडावार व साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकार यांना दिलेत. रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांसमोर ऑटोरिक्षा युनियन, टॅक्सी युनियन, अँपे मिनीडोर युनियन तसेच ग्रामीण ऑटोरिक्षा युनियन आदी संघटनांच्या पदाधिकार्यांनी आपल्या समस्यांचे गार्हाणे मांडले. त्यांच्या समस्यांचे निवारण करताना रावते यांनी ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा शहरात प्रवेश केल्यानंतर कोणत्या ठिकाणी थांबतील, त्यासंदर्भात थांबे निश्चित करण्याचे निर्देश परिवहन अधिकार्यांना दिलेत. बेकायदेशीर आणि अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विनापरवाना वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशदेखील त्यांनी यावेळी दिले. ज्या वाहनधारकांनी नूतनीकरण केलेले नाही, अशा वाहनधारकांनी नुतनीकरण त्वरीत करून घेव्याचे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याशिवाय वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी सर्व विभागांनी मिळून घ्यावी, असे निर्देश त्यांनी बैठकीला उपस्थित अधिकार्यांना दिलेत.
विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई करा!
By admin | Updated: January 12, 2015 01:50 IST