शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

 सात सरपंचांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:40 IST

अकोला जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ८ प्रकरणांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली आहे.

अकोला : ग्रामपंचायतचे कामकाज करताना सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी कर्तव्यात कसूर करणे, गैरवर्तन केल्याने अपात्रतेच्या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल ८ ग्रामपंचायतींच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला. त्यासाठी सुनावणी घेण्यात आली आहे. सर्वच ग्रामपंचायतींच्या संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे आता संबंधितांमध्ये कारवाईची धाकधूक निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांनी कामकाज करताना गैरवर्तणूक करणे, कायद्याने ठरवून दिलेल्या जबाबदाºया पूर्ण करण्यात कुचराई करणे, कर्तव्यात कसूर करणे, यासारख्या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९(१) नुसार संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्यांवर अपात्रेची कारवाई केली जाते. त्यासाठी प्रकरण विभागीय आयुक्तांकडे दाखल केले जाते. अर्धन्यायिक पद्धतीने कामकाज चालणाºया या प्रकरणांचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतंत्रपणे चौकशी करून अहवाल सादर करतात. अकोला जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ८ प्रकरणांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली आहे. अर्जदार, गैरअर्जदार दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची संधी देत अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार आता पुढील सुनावणी विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. आयुक्तांकडे या प्रकरणात पुढील कारवाईचा आदेश दिला जातो.-सात ग्रामपंचायतींची आठ प्रकरणेग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांनी कर्तव्यात कसूर केल्याची सात गावांतील प्रकरणे आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई -२, पळसोद, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड रूपराव, पाथर्डी, बार्शीटाकळी तालुक्यातील कासारखेड, मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव(पूंम), सिरसो या ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव व सदस्यांचा समावेश आहे.

 नियमांचा भंग, अतिक्रमण, शिवीगाळपदावरून अपात्र ठरविण्यासाठी दाखल केलेल्या ८ प्रकरणांत संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांवर प्रामुख्याने ग्रामपंचायत अधिनियमातील नियमांचा भंग करणे, गावातील अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे, सभेत शिवीगाळ करणे, अधिनियमात ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणे, यासारख्या कारणांचा समावेश आहे.

सात सरपंचांविरोधात तक्रारीवडाळी सटवाईचे सरपंच प्रभाकर नथ्थुजी वानखडे, तर वानखडे यांनी इतर सहा सदस्यांविरुद्ध तक्रार केली आहे. पाथर्डीचे सरपंच गजेंद्र वसो, सिरसो-जयश्री सुरेंद्र मेहरे, कासारखेड-हिरासिंग रामू राठोड, गोरेगाव (पूंम)- ताई सुनील सरदार, हिवरखेड- अरुणा सुरेश ओंकारे, पळसोद-शारदा ज्ञानेश्वर आढे यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत