शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वाइन फ्लूचे निदान आता अकोल्यातच; ‘जीएमसी’मध्ये होणार प्रयोगशाळा 

By atul.jaiswal | Updated: October 6, 2018 12:33 IST

अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देअकोल्यातच स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य होणार आहे.अकोला व परिसरात विषाणूजन्य आजारांच्या निदानाची सुविधा नसल्याने नमुने नागपूर किंवा मुंबई येथे पाठवावे लागत होते. ही प्रयोगशाळा व्हावी, यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दीड वर्षांपूर्वीच प्रस्ताव पाठविला होता.

अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. ही प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यानंतर अकोल्यातच स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य होणार आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य, कुटुंब व कल्याण विभागांतर्गत १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्याची योजना आहे. त्यानुसार अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा होणार आहे. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत या प्रयोगशाळेचे कामकाज चालणार आहे. महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेसाठी पाच वर्षानंतर येणाºया आवर्ती खर्चाच्या दायित्वासही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी राज्य शासनातर्फे सामंजस्य करार करण्यास वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांना अधिकार देण्यात आले आहेत.विषाणूंबाबत होणार संशोधनया प्रयोगशळेत विषाणूजन्य आजारांचे निदान तर होईलच, शिवाय इतर बाबींचाही अभ्यास करण्यात येणार आहे. साथ पसरविणाºया विषाणूंचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, आजार निदान संच तयार करणे, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाºयांना प्रशिक्षण देण्याशिवाय विषाणूंबाबत संशोधन आणि अभ्यास करणे, हा या प्रयोगशाळेचा उद्देश असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.दीड वर्षांपूर्वीच पाठविला होता प्रस्तावअकोला व परिसरात विषाणूजन्य आजारांच्या निदानाची सुविधा नसल्याने नमुने नागपूर किंवा मुंबई येथे पाठवावे लागत होते. अहवाल मिळण्यासाठी विलंब होत असे. त्यामुळे अकोल्यात ही प्रयोगशाळा व्हावी, यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दीड वर्षांपूर्वीच प्रस्ताव पाठविला होता.आता लवकर मिळणार अहवालपूर्वी स्वाइन फ्लू किंवा इतर विषाणूजन्य आजारांचे निदान करावयाच्या असल्यास शासकीय व खासगी इस्पितळांना नागपूर किंवा मुंबई येथील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत असे. नमुने पाठविल्यानंतर अहवाल प्राप्त होण्यासाठ विलंब व्हायचा. आता अकोल्यातच प्रयोगशाळा होणार असल्यामुळे वेळेवर निदान होऊन लवकर उपचार करता येतील.राज्य शासनाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ही प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होणार आहे. आजारांचे निदान तातडीने होऊन, विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी ही प्रयोगशाळा लाभदायक ठरणार आहे. -डॉ. राजेश कार्यकर्ते

 

टॅग्स :AkolaअकोलाSwine Flueस्वाईन फ्लू