अकोला - बुलडाणा जिल्हय़ातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील स्वाईन फ्लू चे संशयीत रुग्ण विजय भोपाळे यांना रविवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. भोपाळे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी दिली. ह्यस्वाइन फ्लूह्ण आजाराने राज्यभर खळबळ माजविली असून, १५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६0 च्यावर नागरिकांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. अकोल्याला लागून असलेल्या वाशिम व अमरावती जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण आढळले असून, अमरावती येथे एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. त्या पाठोपाठ आता बुलडाणा जिल्हय़ातील खामगावनजीक असलेल्या जामोद येथील विजय भोपाळे स्वाइन फ्लू चे संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘स्वाइन फ्लू’संशयीत रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ
By admin | Updated: February 23, 2015 01:48 IST