शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:26 IST

चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.सायवाणी शेतकरी सुपाती अमृता गटुले हे १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६.३0 वाजता शेतातून घरी येत असताना पुंडलीक जानकीराम काळे यांच्या शेताजवळ त्यांना बिबट्या दिसला. गटुले यांनी आरडाओरड केल्याने व तेवढय़ात त्या रस्त्याने मोटारसायकल आल्याने बिबट्या पळून गेला. यापूर्वीसुद्धा १३ डिसेंबरला सुपाजी गटुले यांच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले होते. चान्नी येथेसुद्धा रामकृष्ण श्यामराव येनकर या शेतकर्‍याला तीन दिवसांपूर्वी सुकळी शिवारातील त्यांच्या शेतात बिबट्या दिसला होता. यापूर्वीसुद्धा चतारी शिवारातसुद्धा नीलगायींना बिबट्याने ठार मारले, तरी वन विभागाने कार्यवाही करून शेतमजुरांना अभय द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.

बिबटच्या वास्तव्याने शिर्लाचे ग्रामस्थ भयभीत शिर्ला येथील अमोल विठोबा गवई यांच्या शेतात बिबटने डरकाळ्या फोडल्याने गावातील वातावरण भयभीत झाले असून, दहशतीने आबालवृद्ध घरात तर तरुण गावाबाहेर मिळेल ते हत्यार घेऊन बिबट्याच्या शोधात घराबाहेर पडले होते. बिबट्याने शिर्ला गावालगत येण्याची पहिली वेळ आहे. कारणही तसेच आहे, गावाच्या चहूबाजूंनी जलयुक्त शिवारचे पाणवठे आहेत. त्याबरोबरच शिकारीसाठी पशुधन आहे. सायंकाळी आठच्या सुमारास आलेल्या बिबट्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

गुरुवारी पुन्हा  आढळला बिबट! सायवणी येथील सुरेश पाटील यांच्या केळीच्या शेतात मोतीराम ताले यांना बिबट दिसला. त्यांनी सरपंच स्नेहल ताले यांना माहिती दिली. सरपंच ताले यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना दिली. परिसरात वन विभागाचे कर्मचारी एच.आर. राठोड, ताकझुरे, जाधव, दामोदर, कळंद आदींनी भेट देऊन पाहणी केली.

 सध्या तूर, कपाशी, गहू , हरभरा यांचा हंगाम असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाणे गरजेचे आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात जाणे बंद केले आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसेच रात्रीचे भारनियमन बंद करण्याचे गरज आहे.-स्नेहल धनंजय ताले,सरपंच, सायवणी 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण