शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचारी, घंटागाडी चालकांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:47 IST

गत महिनाभरापासून संबंधितांची एकदाही आरोग्य तपासणी न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

अकोला: देशभरासह संपूर्ण राज्यात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. यातही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या भागात साफसफाईची कामे करणारे सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणारे महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांच्या आरोग्य तपासणीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. गत महिनाभरापासून संबंधितांची एकदाही आरोग्य तपासणी न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. अशाही परिस्थितीत महापालिका क्षेत्रातील उत्तर झोनमध्ये ७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर याच झोनमधील आणखी सात जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. शहरात रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक दोनला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी महापालिकेचे शिक्षक तसेच आशा वर्कर कामाला लागले आहेत. याव्यतिरिक्त या दोन्ही प्रतिबंधित भागात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी मनपाचे सफाई कर्मचारी जात आहेत. गत महिनाभरापासून या प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर आरोग्य तपासणी जात असल्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या दोन्ही प्रभागांसह शहराच्या विविध भागात सर्व्हिस लाइन तसेच नाल्यांची दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे सफाई कर्मचारी नियमितपणे करीत आहेत. शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता व नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे होणारे उल्लंघन लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने शिक्षक, आशा वर्कर, सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.महापालिका क्षेत्रात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रात असो वा इतर ठिकाणी साफसफाईची कामे करणारे सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश स्वच्छता व आरोग्य विभागाला दिले आहेत.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या