अभिनय कट्टा, मुंबईचे संचालक किरण नाकती यांच्या द्वारा आयोजित स्पर्धेत मुंबईसह राज्यातील विविध विभागातून स्पर्धक सहभागी झाले होते. दोन गटात झालेल्या या स्पर्धेत बालगटात ईश्वरी हिने संत ज्ञानेश्वराची बहीण मुक्ताईचे पात्र अत्यंत उत्कटतेने साकारले. या स्पर्धेत तिला उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित झाले आहे. या स्पर्धेत विदर्भातून ईश्वरी ही एकमेव विजेती स्पर्धक आहे.
ईश्वरीचे राज्यस्तरीय ऑनलाइन एकपात्री अभिनय स्पर्धेत सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST