शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘सुवर्ण शुभ्रा’:  डॉ. पंदेकृविने विकसित केली कापसाची नवीन जात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:48 IST

मजुरांची वानवा बघता कापूस वेचणी यंत्राने करता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन या कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: ‘सुवर्ण शुभ्रा’ सोन्यासारखं उत्पादन देणारी (पांढर सोनं) कापसाची नवीन जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्यासारखे दर मिळतील का, हे आता बघावे लागणार आहे. मजुरांची वानवा बघता कापूस वेचणी यंत्राने करता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन या कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे.या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत १५ च्यावर कपाशी जाती विकसित करू न शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु बीटी कपाशीने तीन दशकांपूर्वी भारतात प्रवेश केला आणि बीटी कपाशीमुळे उत्पादन वाढते, असा प्रचारही धूमधडाक्यात झाल्याने या बीटीने देशातील ९० टक्के बाजारपेठ काबीज केली. प्रत्यक्षात बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीला प्रतिकार करणारा जीन आहे. आता जेव्हा बीटीवरही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी पुन्हा देशी कपाशीकडे वळत असून, गत पाच वर्षांत देशी कपाशीचे क्षेत्र वाढत आहे. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने देशी कपाशी बियाण्यामध्ये हा जीन टाकून बीजी-२ कपाशी बियाणे बाजारात आणले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे देशी कपाशी बियाण्याची मागणीही वाढतीच आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठाने नवे संशोधन हाती घेतले असून, ‘सुवर्ण शुभ्रा’ हा त्याचाच परिपाक आहे.‘सुवर्ण शुभ्रा’ कपाशीचे उत्पादन इतर सर्वच पारंपरिक जातीपेक्षा जास्त असल्याचा दावा कृषी संशोधकांनी केला आहे. १५० ते १६० दिवसांत येणारी कोरडवाहू क्षेत्रासाठी ही कपाशी आहे. या कपाशीच्या बोंडाचे वजन ३.७ ते ४ ग्रॅम आहे. उत्पादन हेक्टरी १३ ते १६ क्ंिवटल आहे. रुईचा उतारा ३५ ते ३६ टक्के एवढा आहे. धाग्याची लांबी २७ ते २९ मि.मी. असून, तुडतुडे आणि इतर रोगास प्रतिकारक आहे. राज्यस्तरीय संशोधन समितीमध्ये (जॉइंट अ‍ॅग्रोस्को) ‘सुवर्ण शुभ्रा’ला मान्यता दिली आहे. यावर्षी ही जात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.‘सुवर्ण शुभ्रा’ कपाशी इतर पारंपरिक जातीपेक्षा अधिक उत्पादन देणारी आहे. विशेष म्हणजे, तुडतुडे आणि इतर रोगास प्रतिकारक आहे. ही जात शेतकºयांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास आहे.डॉ. डी. टी. देशमुख,विभाग प्रमुख,कापूस संशोधन विभाग,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठcottonकापूस