खदान परिसरातील हैदरपुरा येथील रहिवासी निसार शाह इकराम शाह वय २७ वर्ष यांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते़ डाॅक्टरांनी तपासणी केली असता या युवकास मृत घाेषित केले़ त्यानंतर या युवकाला ज्या दाेन जणांनी दाखल केले हाेते त्यांना बाेलावले असता रुग्णालयात दाखल करण्यासाठी आलेले दाेन्ही युवक रुग्णालयातून पसार झाले़ या प्रकरणाची माहिती सिटी काेतवाली पाेलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. याच वेळेत खदान परिसरातील शेकडाे नागरिक रुग्णालयात दाखल झाले हाेते. या युवकाचा मृत्यू संशयास्पद असल्याने याप्रकरणाची खदान पाेलिसांनी कसून चाैकशी सुरु केली आहे. तर मृतक युवकाचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्यता उजेडात येणार असल्याची माहिती खदान पाेलिसांनी दिली.
खदान परिसरातील युवकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST