शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणामध्ये २४०० फेरीवाल्यांची नोंद; ३८७ जणांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:44 IST

मनपाने संबंधित संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिल्याने हॉकर्स झोनचा गुंता कायमच असल्याचे समोर आले आहे.

अकोला : शहरातील अतिक्रमणाच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ठाणे येथील सेवादल संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेने २ हजार ४०० फेरीवाल्यांची नोंद केली. त्यावर मनपाने आक्षेप-हरकती व सूचना बोलावल्या असता ३८७ व्यावसायिकांनी आक्षेप घेतला. मनपाने संबंधित संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिल्याने हॉकर्स झोनचा गुंता कायमच असल्याचे समोर आले आहे.शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमकांनी गिळंकृत केले आहेत. रेडीमेड ड्रेस विक्रेता, फळ विके्रता तसेच विविध साहित्याची विक्री करणाºया लघुव्यावसायीक, फेरीवाल्यांनी रस्त्यांवरच दुकाने थाटली आहेत. शहरातील मोठी प्रतिष्ठाने, दुकानांसमोर लघुव्यावसायिक बाजार मांडत असल्यामुळे अनेकदा दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. अतिक्रमणाचे लोण गल्लीबोळात पसरल्याची परिस्थिती आहे. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमकांना वारंवार हुसकावून लावल्या जात असल्याने त्रस्त झालेल्या अतिक्रमकांकडून फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या सर्व बाबी ध्यानात घेऊन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरात विशिष्ट भागात ‘हॉकर्स व नो हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ठाणे येथील सेवादल नामक संस्थेला फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा कंत्राट दिला. संबंधित संस्थेने शहरातील २ हजार ४०० लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांची संख्या निश्चित के ली. यादी प्रसिद्ध झाल्यावर मनपाने हरकती, आक्षेप बोलावले असता ३८७ लघुव्यावसायीकांनी आक्षेप नोंदवत त्यांचे नाव समाविष्ट झाले नसल्याचे नमूद केले. ही बाब लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांनी प्राधिकृत केलेल्या समितीमधील अधिकारी, फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.हॉकर्स झोन निश्चित केले; पण...महापालिका प्रशासनाने फेरीवाले, लघुव्यावसायीकांना पर्यायी व्यवस्था म्हणून २१ ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ व ३१ जागा ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केल्या. तशी यादी तयार करण्यात येऊन फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून जागांचे वाटप करण्यात आले होते. तसेच मनपाच्या सभागृहात रीतसर ठरावही घेण्यात आला. या जागांकडे लघुव्यावसायिकांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर दुकाने; चालायचे कसे?शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटल्या जाणाºया अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने गांधी चौक, गांधी रोड चौपाटी, मनपाची आवारभिंत, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज परिसर, मोहम्मद अली मार्ग, ताजनापेठ चौक, टॉवर चौक , धिंग्रा चौकाचा समावेश असून, आयुक्त साहेब याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका