शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘मदर डेअरी’साठी सर्व्हे; रोजगाराची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:55 IST

अकोला : गायीच्या दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारल्या जाणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर मदर फुट्र अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधीने शहरात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देनागपूरचे प्रतिनिधी अकोल्यात

आशिष गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गायीच्या दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारल्या जाणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर मदर फुट्र अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधीने शहरात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरांमध्ये ठिकठिकाणी ‘मदर डेअरी’ प्रकल्प स्थापित करण्याचे पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यारित असणार्‍या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या निर्देशानुसार मदर फ्रुट अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधींनी विदर्भ व मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. पूर्व विदर्भात ‘मदर डेअरी’ उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नागपूर, वर्धा शहरात गायीच्या दुधाचे संकलन व विक्रीदेखील सुरू झाली आहे. अकोला शहरातसुद्धा डेअरी उभारण्याच्या अनुषंगाने मदर फुट्र अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधीने शहराच्या विविध भागात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. डेअरीसाठी महापालिकांचे संकुल तसेच मनपा शाळांच्या इमारतींना प्राधान्य देण्यात आले आहे. 

सेवानवृत्त सैनिकांना प्राधान्यशहरात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी सेवानवृत्त सैनिकांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकल्पांतर्गत डेअरी उभारण्यासाठी शासनाकडून किमान १३ लाख रुपये खर्च केले जातील. कोल्ड स्टोअरेजसह सर्व सुविधांचा त्यामध्ये समावेश राहणार आहे. डेअरी चालवून संबंधिताला महिन्याकाठी किमान १५ हजारांचे उत्पन्न प्राप्त करणे अनिवार्य आहे. 

मनपा आयुक्तांना दिले निर्देशप्रशासकीय पातळीवर पूर्व, पश्‍चिम विदर्भातील १४ जिल्ह्यांमध्ये ‘मदर डेअरी’च्या गठनासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये दुधाचे संकलन व विक्री सुरू झाली आहे. यासंदर्भात डिसेंबर महिन्यात नागपूर येथे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असता अकोला शहराचा उल्लेख झाला. त्यावेळी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांना शहरात डेअरीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली.

स्थानिक स्तरावर शेतकर्‍यांकडून गायीचे दूध खरेदी करणे व त्याची विक्री करण्याचा ‘मदर डेअरी’अंतर्गत समावेश राहील. यामध्ये गायीच्या दुधापासून तयार दुग्धजन्य पदार्थांची विक्री करता येणार आहे. शहरातील ३६ जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढदेखील होऊ शकते. -जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका