शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

१६६ गावातील डाळींच्या भौगोलिक मानांकासाठी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 11:41 IST

शेती उत्पादनाला व्यापक बाजार पेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने बेसलाईन सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यासाठी अभिशाप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच तालुक्यातील १६६ गावातील खारपाणपट्टा हा वरदान ठरून या भागातील डाळी तथा गव्हाला भौगोलिक मानांकन मिळवून देत येथील शेती उत्पादनाला व्यापक बाजार पेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने बेसलाईन सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे.संग्रामपूर, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव तालुक्यातील १,००,२१५ हेक्टरवर उत्पादन घेण्यात येणाºया हरबरा, तूर, उडीद, मुग व अन्य कडधान्यामध्ये मायक्रो पीपीएममध्ये मिठाचे प्रमाण आहे. त्यामुळे या डाळींची एक विशिष्ट चव असून ती अन्यत्र उत्पादीत होणाºया डाळीमध्ये नाही. त्यामुळेच गेल्या एक वर्षापासून कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या वतीने या भागात बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले असून आता खरीप व रब्बी हंगामातील उत्पादन प्रत्यक्ष हातात आल्यानंतर या डाळींमधील न्युट्रीशियनची मात्रा तथा अन्य ठिकाणच्या डाळीपेक्षा यात नेमकी तफावत काय आहे याचे रासायनिक व जैविक विश्लेषण करून खारपाणपट्यातील ही कडधान्ये वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सिद्ध करून त्यास भौगोलिक मानांकन मिळविण्यात येणार आहे.त्यादृष्टीने कृषी विभाग चैन्नई स्थित केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रत्यक्षात या मोहिमेअंतर्गत नाविन्यता शोधून आणखी काम करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष मानांकन मिळाल्यानंतर या भागातील डाळी, गव्हाला राज्यात एक वेगळी ओळख मिळण्यासोबतच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

लोकल ते ग्लोबलसध्या लोकलस्तरावर मागणी असलेले येथील कडधान्याला ग्लोबल स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. खारपाणपट्ट्याच्या अनेक समस्या आहेत. किडणी आजारासह अन्य काही आरोग्य विषयक समस्या येथे आहे. त्यामुळे खारपाणपट्टा हा एक प्रकारे शाप असल्याची भावना या भागातील नागरिकांमध्ये आहे. मात्र येत्या काही वर्षात हा खारपाणपट्टा येथील कृषी उत्पादनामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो, तसे प्रयत्न सुरू झाले आहेत.हरभऱ्यालाही मोठी मागणीया पट्ट्यात येणाºया हरभºयालाही फुटाणे बनविण्याच्या उद्योगात चांगली मागणी असल्याचे सर्वेक्षणात तथा काही शेतकºयांच्या चर्चेतून समोर आले आहे. त्यामुळे येथील हरभºयाचीही ग्लोबल ओळख निर्माण होऊ शकते. अनेकदा व्याºयांकडून या पट्ट्यातील हरभºयाला चांगला भाव देण्यासोबतच त्याची मागणी केल्या जाते. त्यामुळे येथील हरभºयासाठीही राज्यात एक मोठी बाजारपेठ या माध्यमातून उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

गव्हाची जानोरीही शर्यतीतशेगाव शहरापासून १४ किमी अंतरावरील जानोरी हे गाव गव्हाची जानोरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे कोरडवाहू क्षेत्रात गावरान गहू गेल्या दशकापर्यंत घेण्यात येत होता. संपूर्ण राज्यात बारीक, लांब आणि कुरड्यासाठी प्रती किलो ३०० ते ४०० ग्रॅम चिक देणाºया या गव्हाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पाणी न देता हा गहू काढल्या जात होता. विशिष्ट चव व पौष्टीकता हे या गव्हाचे वेगळे पण आहे. त्याचे बियाणे येथे जतन केले गेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती