शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकाच्या दांडीमुळे सर्वेक्षण रद्द! चोंढी परिसरातील चित्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:11 IST

चोंढी : गारपीटमुळे चोंढी, अंधारसांगवी, चारमोळी, पांढुर्णा परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिले आहेत. चोंढी परिसरात कृषी सहायकाने दांडी मारल्याने १३ फेब्रुवारी रोजी नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणच होऊ शकले नाही. त्यामुळे या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. 

ठळक मुद्देग्रामसेवक, तलाठी नुकसानग्रस्त शेतातून गेले परत!

लोकमत न्यूज नेटवर्कचोंढी : गारपीटमुळे चोंढी, अंधारसांगवी, चारमोळी, पांढुर्णा परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिले आहेत. चोंढी परिसरात कृषी सहायकाने दांडी मारल्याने १३ फेब्रुवारी रोजी नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणच होऊ शकले नाही. त्यामुळे या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील चोंढी, चारमोळी, अंधारसांगवी, पांढुर्णा आदी गावांमध्ये ११ फेब्रुवारी रोजी गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, कांदा या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  नुकसानाची पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश कृषी मंत्री फुंडकर यांनी दिले. त्यावरून तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना १३ फेब्रुवारीला शेतीची पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक हे चोंढी परिसरातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचले; परंतु कृषी सहायक शेळके हे चक्क गैरहजर राहिले. त्यामुळे घटनास्थळी शेतीची पाहणी करायला आलेले तलाठी खंडारे, हेडाऊ व ग्रामसेवक कापकर यांनी कृषी सहायक शेळके हे गैरहजर असल्यामुळे शेतीचा सर्व्हे करण्याचे रद्द केले.  त्यामुळे मदतीची आस असलेल्या चोंढी, चारमोळी, पांढुर्णा येथील शेतकर्‍यांची कृषी सहायकांच्या बेजबाबदारपणे निराशा झाली.त्यामुळे शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवणार्‍या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी कृषी सहायक आर.आर.शेळके यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ - हरीश पिंपळेमूर्तिजापूर तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. शासनाच्या दरबारात पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ, असे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देताना बोलत होते.४मूर्तिजापूर मतदारसंघातील काही परिसरात शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. संबंधित विभागाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ४कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी ताबडतोब प्रत्येक नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणीसोबत पंचनामा करणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मदत केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले आहे. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही पिंपळे म्हणाले. 

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ - हरीश पिंपळेमूर्तिजापूर तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. शासनाच्या दरबारात पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ, असे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देताना बोलत होते.मूर्तिजापूर मतदारसंघातील काही परिसरात शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. संबंधित विभागाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी ताबडतोब प्रत्येक नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणीसोबत पंचनामा करणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मदत केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले आहे. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही पिंपळे म्हणाले. 

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण