तहसीलदार व मंडल अधिकारी, तलाठी यांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त केला हाेता. ही रेती ही वाहनांनाव्दारे तहसील कार्यालयात आणण्याची प्रक्रिया सुरू असताना, या वाहनात वाहन चालकासोबत विठ्ठल नरहरी वारूळकर या शिपायाला पाठविले. दरम्यान, शिपायाने वाहनात असलेली सहा ब्रास रेती तहसील कार्यालयात जमा न करता स्वतःच्या घराजवळ टाकली आणि वाहन चालकास, ‘तुला कोणी, रेती कुठे खाली केली, असे विचारले, तर तहसीलमध्येच खाली केली’, असे सांगावे, असे शिपायाने सांगितले. त्यावर तहसीलदार राजेश गुरव यांनी जीपीएस लोकेशन घेऊन व चौकशी करून याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या शिपायास निलंबित केले, अशी माहिती तहसीलदार राजेश गुरव यांनी दिली.
जप्त केलेली रेती घरी नेणे भोवले, शिपाई निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST