शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रिया ‘फेल’!

By admin | Updated: August 6, 2016 01:59 IST

स्वत:च केलेली शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञाने ठरविली चुकीची, रुग्णांच्या आरोग्यासोबत खेळ.

अकोला, दि. ५: सर्वोपचार रुग्णालयात वृद्ध महिला रुग्णावर मे महिन्यात चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने, तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ रुग्णालयातील डॉक्टरमुळे आली आहे. विशेष म्हणजे, ज्या अस्थिरोग तज्ज्ञाने महिलेवरील शस्त्रक्रिया केली होती, त्याच अस्थिरोग तज्ज्ञाने ही शस्त्रक्रिया चुकीची ठरविली आहे. यावरून सर्वोपचार रुग्णालयात गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी, त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्हय़ातील संग्रामपूर येथील सुधा अरुण कतले(६0) या महिलेची कमर दुखत असल्याने, तिला मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यात सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. वृद्ध महिला बीपीएल कार्डधारक असल्याने तिच्यावर जीवनदायी योजनेंतर्गत ३0 मे रोजी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान कमरेमध्ये कृत्रिम जोड बसविण्यात आला. त्यानंतर ४ जूनला वृद्धेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी गेल्यावर काही दिवसातच वृद्धेच्या कमरेमध्ये पुन्हा वेदना होऊ लागल्या. वेदना वाढल्यामुळे १६ जुलै रोजी वृद्धेला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञाला दाखविण्यात आले. याच अस्थिरोग तज्ज्ञाने वृद्धेवर शस्त्रक्रिया केली होती. त्यानेच सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे वृद्ध व तिच्या नातेवाइकांना सांगितले आणि आता पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असून, त्यासाठी ६0 हजार रुपये खर्च येईल, असेही या अस्थिरोग तज्ज्ञाने सांगितले. वृद्ध व तिच्या नातेवाइकांनी गरीब परिस्थितीमुळे एवढी रक्कम कुठून आणावी? तुम्हीच शस्त्रक्रिया केली असल्याने आम्ही तुमच्याकडे आलो, असे सांगितले; परंतु या डॉक्टरने त्यांना सर्वोपचार रुग्णालयाचा रस्ता दाखविला. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वृद्धेला २१ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु अद्यापपर्यंंतही वृद्धेवर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. जीवनदायी योजनेतून वृद्धेची शस्त्रक्रिया करायची आहे; परंतु त्याची मंजुरी अद्याप मिळाली नसल्यामुळे शस्त्रक्रिया थांबलेली आहे. ज्या अस्थिरोग तज्ज्ञाने ही शस्त्रक्रिया केली. त्याच अस्थिरोग तज्ज्ञाने ती चुकीची ठरविली. यावरून खासगी रुग्णालयातील डॉक्टर सर्वोपचार रुग्णालयामध्ये काम करताना किती गंभीर आहेत, हे दिसून येते. सर्वोपचार रुग्णालयात काम करण्यासाठी शासन त्यांना लाखो रुपयांचे मानधन देते; परंतु त्याची जाणीव न ठेवता, हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करतात, हेच यातून अधोरेखित होते.