शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

एमआयडीसीतील बनावट पाइप, टाकी बनविण्याचे सुप्रीम काम

By नितिन गव्हाळे | Updated: October 5, 2023 19:17 IST

एमआयडीसी पोलिसांचा छापा: ४ लाखांचे बनावट पाइप, टाकी जप्त

अकोला : सुप्रीम कंपनीच्या नावाखाली अकोल्यातील एमआयडीसीत बनावट पाइप, पाण्याची टाकी बनविण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. याबाबत मुंबईच्या सुप्रीम कंपनीच्या संचालकांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीत बुधवारी छापा घातला असता, सुप्रीम कंपनीसारखेच हुबेहूब बनविलेले पाइप, पाण्याच्या टाक्या आढळून आल्या.

पोलिसांनी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन प्रतिष्ठानांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुप्रीम इंडस्ट्रिज लि. चे अधिकृत प्रतिनिधी श्रीहर शिवशरण त्रिपाठी (रा. गाजियाबाद) यांच्या तक्रारीनुसार त्यांची कंपनी प्लास्टिक पीव्हीसी पाइप व पाण्याच्या टाकीचे उत्पादन करते. कंपनीचे उत्पादन भारतभर विकले जाते. ३ ऑक्टोबर रोजी त्यांना अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक ३ मध्ये असलेल्या हिना ट्रेडर्सचे मालक हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया हे सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे डुप्लिकेट पीव्हीसी पाइपची निर्मिती करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याने, आमच्या कंपनीची बदनामी व आर्थिक नुकसान झाले आहे.

तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी हिना ट्रेडर्स येथे छापा घालून सुप्रीम कंपनीचे विविध प्रकारचे बनावट पाइपचे १२ बंडल (एकूण ५४१ पाइप) जप्त केले आहेत. या बनावट पाइपची एकूण किंमत १ लाख ६२ हजार ३०० रुपये आहे. यासोबतच श्रीराम हार्डवेअर कुंभारी रोड शिवर येथील गौरव बुब, गोपाल बुब यांच्याकडेही पोलिसांनी छापा घालून सुप्रीम कंपनीचे बनावट सीपीव्हीसी पाइप आढळून आले. त्याची किंमत ३९ हजार रुपये आहे. तसेच, एमआयडीसी क्रमांक ३ मधील साईधाम प्लास्टिक फॅक्टरीचे राजकुमार लठोरिया यांच्याकडेही छापा घालून सुप्रीम कंपनीच्या बनावट ५०० व १००० लिटर पाण्याची क्षमता असलेल्या प्रत्येकी १४ अशा २८ पाण्याच्या टाकी आढळून आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी राम चव्हाण करीत आहेत.या कलमांनुसार पाच व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखलसुप्रीम कंपनीच्या नावाखाली बनावट पाइप, पाण्याच्या टाक्यांची निर्मिती करून त्याची बाजारपेठेत विक्री केल्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया, गौरव बुब, गोपाल बुब व राजकुमार लठोरिया यांच्याविरूद्ध ट्रेडमार्क अधिनियम १९९९ कलम १०२,१०३,१०४ कॉपीराइट अधिनियम १९५७ कलम ६३, ६५, आरआयपीसी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार एमआयडीसीच्या पोलिस निरीक्षक वैशाली मुळे, एपीआय किशोर वानखेडे, दयाराम राठोड, सुनील टाकसाळे, राम काळे, एएसआय मुळतकर यांनी केली.

टॅग्स :Akolaअकोला