लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या ४0 हजार स्क्वेअर फुटांच्या भूखंडाचे बनावट दस्तावेज करणारे तसेच ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड हडपण्यासाठी गजराज मारवाडी याला सर्वतोपरी मदत करणार्या त्या अधिकारी व कर्मचार्यांची भूमी अभिलेख विभागाकडून पाठराखण केल्या जात असल्याचे आता स्पष्ट दिसून येत आहे. ज्या कालावधीत हा भूखंड ऑनलाइन दस्तावेजाद्वारे हडपण्यात आला त्या कालावधीतील संबंधित टेबलवर व संगणकावर असलेल्या कर्मचार्यांची नावे पोलिसांना देण्यात भूमी अभिलेख विभाग दिरंगाई करीत असल्याने हा विभागाच आता संशयाच्या फेर्यात सापडला आहे.अकोला शहरातील शीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शीट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिराच्या पाठीमागील भागात मोठे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून २0 कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर म्हणजेच तब्बल ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंडाची हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुडदमल मारवाडी यांच्या नावाने हा भूखंड असल्याची संगणकीकृत खोटी नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर अशाच प्रकारच्या बनावट दस्तावेजाद्वारे खोटे मालमत्ता पत्रकही तयार करण्यात आले आहे. या जागेचे फेरफार व अन्य दस्तावेजही बनावट तयार करण्यात आले आहेत. शासनाचा भूखंड गजराज मारवाडी याच्या नावे करण्यासाठी भूमी अभिलेखचे कर्मचारी व अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असताना त्या अधिकारी व कर्मचार्यांची नावे अद्यापही पोलिसांना का देण्यात आली नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संगणक चालक व लिपिकाचा शोध घेण्यात चालढकल करण्यात येत आहे.
दस्तावेज बनविणार्यांची पाठराखण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:43 IST
अकोला: शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या ४0 हजार स्क्वेअर फुटांच्या भूखंडाचे बनावट दस्तावेज करणारे तसेच ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड हडपण्यासाठी गजराज मारवाडी याला सर्वतोपरी मदत करणार्या त्या अधिकारी व कर्मचार्यांची भूमी अभिलेख विभागाकडून पाठराखण केल्या जात असल्याचे आता स्पष्ट दिसून येत आहे. ज्या कालावधीत हा भूखंड ऑनलाइन दस्तावेजाद्वारे हडपण्यात आला त्या कालावधीतील संबंधित टेबलवर व संगणकावर असलेल्या कर्मचार्यांची नावे पोलिसांना देण्यात भूमी अभिलेख विभाग दिरंगाई करीत असल्याने हा विभागाच आता संशयाच्या फेर्यात सापडला आहे.
दस्तावेज बनविणार्यांची पाठराखण?
ठळक मुद्देभूमी अभिलेख विभागाची दिरंगाई संशयाच्या फेर्यातगुन्हा दाखल नाही; जामीन मिळविला