शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन प्रकरणातील पुरवठादार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:30 IST

कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना  कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक  चिक इजियानी या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व  रामदास पेठ पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस  अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत  दिली.

ठळक मुद्देपाठलाग करून अटकतीन पोलीस कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना  कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक  चिक इजियानी या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व  रामदास पेठ पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस  अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत  दिली. जेम्स व विजय हिरोळे हे दोघेही ट्रांझीट वॉरंटवर  असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार  आहे. अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे  ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑ क्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या  कोकेनची राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे  सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकरनगरातील रहिवासी विजय ऊर्फ  बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा  मुंबईतील रहिवासी तसेच मूळचा नायजेरिया येथील ‘जेम्स’  ऊर्फ लुक चिक इजियानी रा. मीरा रोड नामक व्यक्तीकडून  कोकेनची खरेदी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले  होते. रामदास पेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी  जेम्सचा शोध घेत शनिवारी मुंबईतून अटक केली. या प्रकरणात  सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश  कन्हैयालाल संतांनी हे दोघे अकोल्यातील कोकेनचे खरेदीदार  असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत  सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक  गुन्हे शाखाप्रमुख कैलास नागरे, रामदास पेठचे ठाणेदार शैलेश  सपकाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली. पत्रकार  परिषदेला पोलीस उप अधीक्षक राहुल धस, वाहतूक शाखाप्रमु ख विलास पाटील उपस्थित होते.

पोलीस कर्मचार्‍यांनी केला पाठलागजेम्सला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला करून  पसार झाला. तो पळताच पोलीस कर्मचारी अमित दुबे, राजेश  वानखडे, शक्ती कांबळे आणि राजेश आकोटकर यांनी त्याचा  पाठलाग करून अटक केली. यामध्ये सदर तीनही कर्मचार्‍यांच्या  पायाला गंभीर दुखापत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यांनी केली कारवाईपोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, राजेश वानखडे, अमित  दुबे, शक्ती कांबळे,  मनोज नागमते, रवी पालीवाल, अजय  नागरे, जितेंद्र हरणे, संजय पाटील, अनिल राठोड, तसेच  रामदास पेठचे संजय आकोटकर, राजपाल ठाकूर, भारसाकळे  व दिनकर धुरंधर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हा